'हम आपके है कौन'मधील मृत्यूचा सीन, बडजात्यांची माफी, रीमा लागूंचं रडणं; रेणुका यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:23 IST2025-10-09T11:22:33+5:302025-10-09T11:23:15+5:30

Renuka Shahane:अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नव्वदच्या दशकात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. विशेषतः १९९४ साली 'हम आपके हैं कौन' चित्रपटातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांचा शिड्यांवरून घसरून पडण्याचा सीन आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Sooraj Barjatya kept apologising to Renuka Shahane during Hum Aapke Hai Koun death scene, Reema Lagoo started crying | 'हम आपके है कौन'मधील मृत्यूचा सीन, बडजात्यांची माफी, रीमा लागूंचं रडणं; रेणुका यांनी सांगितला किस्सा

'हम आपके है कौन'मधील मृत्यूचा सीन, बडजात्यांची माफी, रीमा लागूंचं रडणं; रेणुका यांनी सांगितला किस्सा

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी नव्वदच्या दशकात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. विशेषतः १९९४ साली 'हम आपके हैं कौन' चित्रपटातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांचा शिड्यांवरून घसरून पडण्याचा सीन आजही अनेकांच्या लक्षात आहे. तो सीन शूट करताना रेणुका यांना एकीकडे गंमत वाटत होती, तर दुसरीकडे चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू मात्र मेकअप रुमपर्यंत धाय मोकलून रडत होत्या.

'हम आपके है कौन'मध्ये रेणुका शहाणे यांनी पूजा भाभीची भूमिका साकारली होती. सूरज बडजात्या दिग्दर्शित या ब्लॉकबस्टर कौटुंबिक चित्रपटात, 'लो चली मैं' या गाण्याच्या शेवटी पूजा (रेणुका शहाणे) साडीच्या पदरामुळे घरातील मुख्य शिड्यांवरून घसरून खाली पडतात. हीच घटना त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते, ज्यामुळे चित्रपटाच्या कथानकाला महत्त्वाचं वळण मिळतं. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा सीन पाहून प्रेक्षकांना अश्रू आवरले नव्हते.

सीन शूट करताना रेणुका यांना गंमत का वाटली?
रेणुका शहाणे यांनी अनेक मुलाखतींमध्ये या सीनबद्दल सांगितलं आहे. सीनमध्ये दिसणारी शिडी प्रत्यक्षात स्पंजची बनवलेली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी रेणुका यांना कोणतीही इजा होऊ नये याची विशेष काळजी घेतली होती. रेणुका यांनी सांगितलं की, "मी खरेतर जखमी झाले नव्हते, पण दुखापतीचा अभिनय करावा लागला. तो फारच कठीण भाग होता."

बडजात्या सतत मागत होते माफी
शूटिंगदरम्यान दिग्दर्शक सूरज बडजात्या सतत रेणुकांकडून माफी मागत होते. त्यांची ही सततची माफी ऐकून रेणुका यांना अवघडल्यासारखं वाटायचं. त्या बडजात्या यांना सांगायच्या, "सर, हा सर्व चित्रपटाचा भाग आहे, वास्तव नाही. त्यामुळे तुम्ही सॉरी म्हणण्याची गरज नाही." मात्र तरीही भावुक झालेले बडजात्या हा सीन शूट झाला त्या दिवसभर रेणुका यांची माफी मागत होते. या सीनमुळे केवळ दिग्दर्शकच नव्हे, तर रेणुकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यादेखील फार भावुक झाल्या होत्या. सीन संपल्यानंतरही त्यांचे रडणे थांबले नव्हते. अगदी मेकअप रूमपर्यंत रीमा लागूंना रडू आवरले नाही, अशी आठवणही रेणुका शहाणे यांनी सांगितली.

Web Title : रेणुका शहाणे ने 'हम आपके हैं कौन' के मृत्यु दृश्य के इमोशन को याद किया।

Web Summary : रेणुका शहाणे ने 'हम आपके हैं कौन' के मृत्यु दृश्य को याद किया। स्पंज की सीढ़ियाँ उसे मज़ेदार लगीं, जबकि निर्देशक सूरज बड़जात्या ने बार-बार माफी मांगी। रीमा लागू, जो उनकी माँ की भूमिका निभा रही थीं, मेकअप रूम में भी बेतहाशा रोईं।

Web Title : Renuka Shahane recounts 'Hum Aapke Hain Koun' death scene emotions.

Web Summary : Renuka Shahane recalls the 'Hum Aapke Hain Koun' death scene. She found the sponge stairs amusing, while director Sooraj Barjatya profusely apologized. Reema Lagoo, playing her mother, cried inconsolably even in the makeup room.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.