तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 08:00 IST2018-08-18T14:01:52+5:302018-08-19T08:00:00+5:30
सध्या बी टाऊनमध्ये सेलिब्रेटींच्या लग्नाची धूम सुरु आहे. आज सकाळीचं प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत रोका केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्नची तारीख जवळपास कंन्फर्म झाली आहे.

तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन ?
सध्या बी टाऊनमध्ये सेलिब्रेटींच्या लग्नाची धूम सुरु आहे. नुकताच प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत रोका केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्नची तारीख जवळपास कंन्फर्म झाली आहे. दीपिका आणि रणबीरला अभिनेता कबीर बेदीने दोघांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यानंतर ही बातमी कंन्फर्म झाल्यात जमा आहे. दोघे नोव्हेबरमध्ये इटलीमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत.
यानंतर बॉलिवूडचा आणखीन एक स्टारचे नाव या लिस्टमध्ये सामील होणार असल्याचे समजतेय. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आजच्या पिढीतील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला वरुण धवन आहे. सध्या वरुन त्याच्या आगामी सिनेमा सुई-धागाचे प्रमोशन करतोय. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुण इंटरव्हु दरम्यान म्हणाला की, ''माझ्या लग्नाला अजून तसा वेळ आहे मात्र खूप वेळा नाहीय.'' वरुण नेहमीच गर्लफ्रेंड नताशासोबत आऊटिंग करताना किंवा पार्टीच्या ठिकाणी दिसतो. काही दिवसांपूर्वी दोघे लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले होते.
लवकरच वरुण आणि अनुष्काचा सुई-धागा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या वरूणने मौजी आणि अनुष्काने ममताची भूमिका साकारली आहे. ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. आतापर्यंत वरूणने विविध भूमिका केल्या आहेत. तर अनुष्कादेखील पहिल्यांदाच एका गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांनीही आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका केल्या होत्या. स्वदेशी वस्तूंवर नेहमीच आपल्या देशात जोर देण्यात आला आहे.