Sonu Sood : सोनू सूदचा चंद्रपूर ते नागपूर प्रवास, गुटखा खाणाऱ्याला फटकारलं; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:14 PM2023-01-16T16:14:02+5:302023-01-16T16:16:25+5:30

सोनू सूद कारमधून चंद्रपूर ते नागपूर असा प्रवास करत होता. रात्रीचे सुमारे साडेदहा वाजले होते.

sonu sood stops at a tea stall asks man to stop eating gutkha go and spit it video viral | Sonu Sood : सोनू सूदचा चंद्रपूर ते नागपूर प्रवास, गुटखा खाणाऱ्याला फटकारलं; व्हिडिओ व्हायरल

Sonu Sood : सोनू सूदचा चंद्रपूर ते नागपूर प्रवास, गुटखा खाणाऱ्याला फटकारलं; व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या साध्या सरळ वागण्याने चाहत्यांचे मन जिंकत असतो. कोरोना काळात त्याने अनेक जणांना मोलाची मदत केली आहे. आता सुद्धा त्याच्या घराबाहेर मदत मागण्यासाठी, किंवा त्याचे आभार मानण्यासाठी गर्दी जमलेली असते. तोही सर्वांना आदराने भेटतो त्यांची विचारपूस करतो. नुकताच सोनू सूद नागपूर ते चंद्रपूर असा प्रवास करत असताना एका चहाच्या टपरीवर थांबला. तिथे नेमकं काय घडलं बघा.

सोनू सूद कारमधून चंद्रपूर ते नागपूर असा प्रवास करत होता. रात्रीचे सुमारे साडेदहा वाजले होते. सोनू एका चहाच्या टपरीवर थांबला. तिथे त्याने चहावाल्याशी आणि आजुबाजुंशी दिलखुलास गप्पा मारल्या. 'एवढया रात्री ग्राहक येतात का, किती कप विकले गेले सकाळपासून किती कप विकले गेले असं तो चहावाल्याला विचारतो. २०० ते ३०० कप चहा विकला हे ऐकून सोनू म्हणतो मला पण पार्टनर बनव की तुझ्या या व्यवसायात.'

यानंतर सोनू जवळच उभ्या असलेल्या इतर दोघांशी गप्पा मारायला जातो. तेव्हा त्यातील एका जणाने तोंडात गुटखा धरलेला असतो. हे बघून सोनू म्हणतो, 'गुटखा खातो को तू, चांगली गोष्ट नाही ही जा फेकून ये. आता कधीच गुटखा खाऊ नकोस', असंही त्याला सांगताना दिसत आहे. सोनू सूदचा हा मनमोकळेपणा बघून चाहतेही कौतुक करत आहेत. 

सध्या सोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसेच सोनूने आगामी सिनेमासाठी पटकथा लेखनही केले आहे. फतेह हा त्याचा लेखक म्हणून पहिलाच सिनेमा असणार आहे. याचवर्षी जून-जुलै मध्ये सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

Web Title: sonu sood stops at a tea stall asks man to stop eating gutkha go and spit it video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.