सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 15:13 IST2021-05-24T15:13:05+5:302021-05-24T15:13:50+5:30

नुकतीच काही मंडळी मदत मागण्यासाठी त्याच्या घराच्यासमोर जमली होती.

Sonu Sood meets people seeking help outside his Mumbai home. watch video | सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला...

सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला...

ठळक मुद्देसोनूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान अनेक मजदूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. सोनूने त्याच्या खर्चाने मजदूरांची घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून देत आहे. सोनू लोकांसाठी आता देवदूत बनला आहे. 

सोनू सोशल मीडियाद्वारे अनेकांना मदत करत असतो. नुकतीच काही मंडळी मदत मागण्यासाठी त्याच्या घराच्यासमोर जमली होती. त्यावेळी सोनूने घराच्या बाहेर येऊन त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

सोनूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही लोक सोनूच्या पाया पडताना दिसत आहेत. सोनूचा हा व्हिडिओ वीरल भयानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. सोनू घराच्या बाहेर उभा असून तो लोकांच्या समस्या ऐकत आहे. लोक त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असून तुम्ही असे करू नका.... असे सोनू त्यांना सांगताना दिसत आहे. 

सोनू सूद पाया पडू नका असे हात जोडून लोकांना सांगत आहे. हा व्हिडिओ पाहून सोनू सूदचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक लोक करत आहेत. 

Web Title: Sonu Sood meets people seeking help outside his Mumbai home. watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.