सोनू सूदनं Rodies-19 मधील या स्पर्धकाला दिला मोठा ब्रेक, चाहते करताहेत अभिनेत्याचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 15:17 IST2023-06-13T15:16:11+5:302023-06-13T15:17:16+5:30

Sonu Sood : रोडीज-19 चा होस्ट बनून रसिकांची मने जिंकणारा सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे.

Sonu Sood gave this contestant a big break in Rodies-19, fans praise the actor | सोनू सूदनं Rodies-19 मधील या स्पर्धकाला दिला मोठा ब्रेक, चाहते करताहेत अभिनेत्याचं कौतुक

सोनू सूदनं Rodies-19 मधील या स्पर्धकाला दिला मोठा ब्रेक, चाहते करताहेत अभिनेत्याचं कौतुक

सोनू सूद (Sonu Sood) हा असाच एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याला आजच्या काळात कोणाच्याही परिचयाची गरज नाही. आपल्या अभिनयासोबतच हा अभिनेता त्याच्या उदात्त कर्मामुळे लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. सोनू सूद कोरोना काळात आणि ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. वेळोवेळी आपल्या कृतीने आपल्या उमदा हृदयाचा दाखला देणाऱ्या सोनू सूदने नुकतीच पुन्हा एकदा मने जिंकली आहेत. रोडीज सीझन 19 सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या 'फतेह' चित्रपटात एका स्पर्धकाला मोठी संधी दिली आहे.

रोडीज-19 चा होस्ट बनून रसिकांची मने जिंकणारा सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. आता त्याने अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपटात काम करण्याची मोठी संधी शुभमला दिली आहे, जो गाझियाबादहून रोडीजमध्ये १९व्या सीझनच्या ऑडिशन्समध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्याच्या जिद्द आणि समर्पणाने प्रभावित होऊन उत्तर प्रदेशातील शुभमला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय सोनू सूदने घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 'फतेह' हा सोनू सूदच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात चाहत्यांना त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिसची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सोनू सूदचा आगामी चित्रपट 'फतेह' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. हॉलिवूडचा स्टंटमॅन आणि दिग्दर्शक ली विटकर यांनी अॅक्शन सीक्वेन्सची जबाबदारी स्वीकारली आहे, याची माहिती स्वतः सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Web Title: Sonu Sood gave this contestant a big break in Rodies-19, fans praise the actor