तुम्ही सर्वात गरीब...! सोनू सूदने देशातील धनदांडग्यांना दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 13:11 IST2021-03-16T13:11:30+5:302021-03-16T13:11:51+5:30
मंगळवारी सोनू सूदने एक ट्वीट केले आणि त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

तुम्ही सर्वात गरीब...! सोनू सूदने देशातील धनदांडग्यांना दाखवला आरसा
पडद्यावर विलन पण ख-या आयुष्यात रिअल हिरो असलेल्या सोनू सूदची बातच काही और. कोरोना काळात सोनूने केलेली मदत लोक आजही विसरलेले नाहीत. आत्ताही त्याच्या मदतीचा ओघ सुरु आहे. हाक दिली की, सोनू हाकेला ‘ओ’ देणार याची खात्री झाल्याने अजूनही लोक सोशल मीडियाद्वारे सोनूकडे मदत मागत आहेत आणि सोनूही त्यांना मदत करताना दिसतोय. शिवाय समाजातील लोकांना आरसा दाखवण्याचे कामही तो चोख बजावताना दिसतोय.
मंगळवारी सोनू सूदने एक ट्वीट केले आणि त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘दुनिया में दो तरह के गरीब है, एक जो हालातों से हैं, और दुसरे जो इन गरिबों की मदद नहीं कर पाए. यह दुसरे वाले पहले वालों से बडे गरीब है,’ असे सोनूने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. या ट्वीटमधून जणू सोनूने देशातील श्रीमंताना आरसा दाखवला आहे.
सोनूने सकाळी 11.30 वाजता हे ट्वीट केले. एका तासाभरातच 1200 वर लोकांनी त्याचे हे ट्वीट रिट्वीट केले. हजारो लोकांनी लाईक केले. कमेंट्सचा तर पूर आला.
देशात तुझ्यासारखा एकच श्रीमंत आहे, असे एका युजरने लिहिले. अर्थात काहींनी या टिष्ट्वटवरून सोनूला ट्रोलही केले. मदत करणे चांगली गोष्ट आहे पण स्वत:चा उदोउदो करणे चूक आहे, असे काहींनी त्याला सुनावले.