अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:40 IST2025-10-28T18:38:24+5:302025-10-28T18:40:43+5:30
Sonu Nigam : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या विधानामुळे चर्चेत आला आहे. हा वाद ८ वर्षांपूर्वीचा आहे, जो पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या विधानामुळे चर्चेत आला आहे. हा वाद ८ वर्षांपूर्वीचा आहे, जो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तो नुकताच श्रीनगरमधील त्याच्या एका कॉन्सर्टसाठी गेला होता. जिथे अजान सुरू झाल्यामुळे सोनू निगमने आपला शो देखील थांबवला, ज्यामुळे लोकांनी त्याचे कौतुकही केले. पण, या कॉन्सर्टला फार कमी प्रेक्षक पोहोचले. याचे कारण तोच आठ वर्षांपूर्वीचा वाद असल्याचे सांगितले जात आहे. चला, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा क्लिप डल लेकजवळील एका आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झालेल्या सोनू निगमच्या कॉन्सर्टचा असल्याचे दावा केला गेला आहे. अजान सुरू झाल्यावर सोनू निगमने गाणे थांबवले. तो म्हणाला की, "कृपया मला दोन मिनिटे द्या, येथे अजान सुरू होणार आहे." त्याने हे बोलताच लोकांनी त्याच्या या वक्तव्याचा आदर करत टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
सोनू निगमने अजानमुळे शो थांबवला
अजान संपताच सोनू निगमने पुन्हा आपला शो सुरू केला. मात्र हा कॉन्सर्ट चर्चेत राहिला कारण केंद्रातील बहुतांश जागा रिकाम्या होत्या. त्यांच्या कॉन्सर्टला कमी लोक पोहोचले होते. डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, सोनू निगमच्या कॉन्सर्टवर बहिष्कारही टाकण्यात आला होता. कॉन्फरन्स सेंटर प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असेल अशी अपेक्षा होती, पण बहिष्कारामुळे बहुतेक जागा रिकाम्या राहिल्या. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, फार कमी लोक कॉन्सर्ट पाहण्यासाठी पोहोचले होते.
जुना वाद आणि याचा काय संबंध?
यादरम्यान, सोनू निगमचा २०१७ मधील जुना वाद चर्चेत आला आहे. जेव्हा त्याने एका ट्वीटद्वारे वाद ओढवून घेतला होता. तेव्हा त्याने लाउडस्पीकरवरून येणाऱ्या अजानच्या आवाजावर टीका केली होती. त्याने लिहिले होते, "देवाचे भले होवो. मी मुस्लिम नाही. पण रोज सकाळी मला याच अजानमुळे जाग येते. ही सक्तीची धार्मिकता कधी संपणार?" या विधानानंतर तो खूप ट्रोल झाला होता आणि तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.