सोनू निगमने केली ही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 18:23 IST2018-10-03T18:22:48+5:302018-10-03T18:23:38+5:30
सोनू नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. तो ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याची मते नेहमीच मुक्तपणे मांडत असतो. त्याने नुकतेच स्वच्छते संदर्भात त्याचे एक मत मांडले आहे.

सोनू निगमने केली ही मागणी
सोनू निगम आज बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. त्याने एकाहून एक सरस गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याला त्याच्या अनेक गाण्यांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. सोनू नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. तो ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याची मते नेहमीच मुक्तपणे मांडत असतो. त्याने नुकतेच स्वच्छते संदर्भात त्याचे एक मत मांडले आहे. त्याच्या या मताला लोकांचा देखील सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.
२ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त ‘सफाईगिरी पुरस्कार २०१८’ या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून सोनू निगमने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्याने स्वच्छतेसंदर्भात त्याचं मत मांडलं असून सार्वजनिक ठिकाणी कचरा पसरविणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हटलं जात आहे.
‘स्वच्छतेचं महत्व अजूनही आपल्याला समजलं नाही. त्यामुळेच आपण सार्वजनिक ठिकाणी कचरा पसरवतो. खरं तर या गोष्टीला आळा घालण्यासाठी पर्यटन क्षेत्रांमध्ये कॅमेरा बसविण्याची गरज आहे. तसंच कचरा फेकणाऱ्याला किंवा तो पसरविणाऱ्याला एकदा तरी तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे. तरच या गोष्टीला आळा बसेल’, असे मत त्याने या पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान व्यक्त केले.
कचरा फेकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेबद्दल सोनू सांगतो, ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे कचरा पसरविणारी व्यक्ती महाराष्ट्राची असो किंवा गुजरातमधील. तिने चूक केली तर त्या व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे’.
‘सफाईगिरी पुरस्कार २०१८’ या सोहळ्याचं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता सिंहने केलं असून या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती दर्शविली होती.