विराट आणि अनुष्काचा पर्सनल बॉडीगार्ड आहे सोनू, त्याचा पगार किती माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:28 IST2025-01-30T17:27:45+5:302025-01-30T17:28:25+5:30
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

विराट आणि अनुष्काचा पर्सनल बॉडीगार्ड आहे सोनू, त्याचा पगार किती माहित्येय का?
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनुष्का आणि विराटला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. अनुष्का आणि विराटही त्यांच्या मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतात. या जोडप्याचा स्वतःचा पर्सनल बॉडीगार्ड आहे जो नेहमी त्यांच्यासोबत दिसतो. अनुष्का आणि विराटच्या अंगरक्षकाचे नाव प्रकाश सिंग उर्फ सोनू आहे. त्याच्या पगाराचा आकडा ऐकून तुम्ही चकीत व्हाल.
सोनू बऱ्याच दिवसांपासून अनुष्का आणि विराटसाठी काम करतो आहे. लग्नाआधीपासूनच सोनू अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड आहे. लग्नानंतर त्याने विराट कोहलीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. सुरक्षेसाठी सोनू अनुष्का आणि विराटकडून चांगलीच सॅलरी घेतो. त्याचा पगार कोणत्याही कंपनीच्या सीईओपेक्षा कमी नाही. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर तो या जोडप्याकडून वर्षाला १.२ कोटी रुपये घेतो.
अभिनेत्री बॉडीगार्डला मानते घरातील सदस्य
अनुष्का सोनूला कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानते. २०१८ मध्ये तिने झिरोच्या सेटवर सोनूचा वाढदिवसही साजरा केला होता. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले होते. अनुष्का पहिल्यांदा आई होणार होती तेव्हा सोनूने तिची खूप काळजी घेतली होती. अनेकवेळा सोनू पीपीई किट घालून गरोदरपणात अनुष्काची काळजी घेत असे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का शर्मा शेवटची झिरो चित्रपटात दिसली होती. तिच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे.