‘पद्मावत’च्या ‘खली बली’ या गाण्यावर स्पायडर मॅन अन् डेडपूलने धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 02:23 PM2018-05-15T14:23:24+5:302018-05-15T20:02:25+5:30

अभिनेता रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ या चित्रपटातील ‘खली बली’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. या गाण्यावर चक्क स्पायडर मॅन आणि डेडपूर हे सुपरहिरो ठेका धरताना दिसत आहेत.

The song "Khali Bali" by Padma Vatkar and Spider Man and DeadPull, see the video! | ‘पद्मावत’च्या ‘खली बली’ या गाण्यावर स्पायडर मॅन अन् डेडपूलने धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

‘पद्मावत’च्या ‘खली बली’ या गाण्यावर स्पायडर मॅन अन् डेडपूलने धरला ठेका, पाहा व्हिडीओ!

googlenewsNext
िनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पद्मावत’चा रंग अजूनही प्रेक्षकांवर बघावयास मिळतो. हा चित्रपट २०१८ मध्ये सर्वांत मोठा सुपरहिट ठरला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीरने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने ‘खली बली’ या गाण्यावर जबरदस्त डान्सही केला होता. त्याचे हे गाणेदेखील चांगलेच सुपरहिट ठरले आहे. विशेष म्हणजे याची भूरळ अमेरिकेचे सुपरहिरो डेडपूल आणि स्पायडर मॅन यांनाही पडल्याचे दिसत आहे. होय, सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये डेडपूल आणि स्पायडर मॅन रणवीरच्या या गाण्यावर जबरदस्त ठेका धरताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये डेडपूल आणि स्पायडर मॅनचे मुव्ज बघण्यासारखे आहेत. दोन्ही सुपरहिरोंचा हा डान्स खरोखरच मजेशीर आहे. 

वास्तविक स्पायडर मॅन आणि डेडपूल कोण्यातरी इव्हेंटमध्ये एकत्र डान्स करीत आहेत. परंतु ते ज्या गाण्यावर डान्स करीत आहेत, त्या गाण्याऐवजी रणवीर सिंगचे ‘खली बली’ हे गाणे एडिट करून सेट केले आहे. परंतु ज्या पद्धतीने दोघांचे मुव्ज बघावयास मिळत आहेत, त्यावरून जणू काही ते खरोखरच ‘खली बली’ या गाण्यावर डान्स करत असावेत असा समज झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय हा व्हिडीओ बघताना या सुपरहिरोचा हा अवतार चेहºयावर हसू फुलवून जातो. 



भारतात ‘डेडपूल-२’ येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सुपरहिरोला हिंदी डबसाठी अभिनेता रणवीर सिंगने आवाज दिला आहे. त्यामुळेच चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. डेडपूल हा एक उद्धट सुपरहिरो आहे. तो नेहमीच बोलताना अपशब्दांचा वापर करीत असतो. दरम्यान, डेडपूल-२’ हा डेडपूलचा सीक्वल असून, पहिल्या भागाप्रमाणेच दुसराही भाग बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

Web Title: The song "Khali Bali" by Padma Vatkar and Spider Man and DeadPull, see the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.