'त्या' ड्रेसमध्ये चुकीच्या पद्धतीने क्लिक झाले सोनम कपूरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 12:15 IST2017-03-04T05:09:23+5:302017-03-04T12:15:16+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके स्टाइल मुळे सोनम कपूर स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते. कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि ...

Sonam Kapoor's photos were wrongly clicked in 'those dress' | 'त्या' ड्रेसमध्ये चुकीच्या पद्धतीने क्लिक झाले सोनम कपूरचे फोटो

'त्या' ड्रेसमध्ये चुकीच्या पद्धतीने क्लिक झाले सोनम कपूरचे फोटो

लिवूडमध्ये आपल्या हटके स्टाइल मुळे सोनम कपूर स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते. कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा  होत असते. जेव्हा जेव्हा सोनम वेगवेळ्या लूकमध्ये वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये हजेरी लावते. तेव्हा सा-यांच्या नजरा फक्त आणि फक्त सोनम कपूरकडेच वळलेल्या दिसतात.नुकतेच एका कार्यक्रमातही असाच काहीसा प्रकार घडला.मात्र यावेळी सोनम कपूरच्या स्टाइलमुळे नाहीतर तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळेच वेगवेगळ्या नजरांनी सोनम कपूरला बघितले जात होते. सोनम कपूरही या वनपिस गाऊनमध्ये कंम्फर्ट नसल्याचे जाणवत होते.या कार्यक्रमात सोनमने काळ्या रंगाचा फेदरनेक असलेला वनपिस घातला होता. या वनपिसमध्ये ती अधिक बोल्ड पाहायला मिळाली.  या कार्यक्रमात एक स्टाइल आयकॉन म्हणून हजेरी लावलेल्या सोनमचे काही फोटोग्राफर्सनी मात्र नको त्या अँगलने तिचे फोटो क्लिक केले.सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच नेटीझन्सकडूनही सोनम कपूरच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.अनेकांनी सोनम कपूरच्या स्टाइलवर टीकाही केली आहे.त्यामुळे सोनमने ज्या फोटोग्राफर्सनी असे फोटो क्लिक केले आहेत. त्या फोटोग्राफर्सनाही तिने चांगलेच खडसावले आहे.सोशल साइटसवर शेअर झालेल्या या फोटोंवर, फोटोग्राफरने चुकीच्या पद्धतीने हे फोटो क्लिक केले आहेत. अशा गोष्टींचा मला काही फरक पडत नाहीय.उलट मला माझा अभिमान वाटत असल्याचे सोनम कपूरने म्हटले आहे. 

Web Title: Sonam Kapoor's photos were wrongly clicked in 'those dress'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.