पार्टीपूर्वी अन् पार्टीनंतर सोनम कपूरची सगळ्यांत आवडती अन् न आवडती गोष्ट कुठली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:31 IST2017-01-11T11:31:53+5:302017-01-11T11:31:53+5:30
sonam kapoor reveals her favorite job after and before party in filmfare awards : sonam kapoor : तुला पार्टीबद्दल अशी कुठली एक गोष्ट आवडते आणि कुठली गोष्ट आवडत नाही? असा प्रश्न सोनम कपूरला विचारला गेला. यावर सोनमने काय उत्तर दिले माहितीयं?

पार्टीपूर्वी अन् पार्टीनंतर सोनम कपूरची सगळ्यांत आवडती अन् न आवडती गोष्ट कुठली?
प र्टी असो वा कुठलेही अवार्ड फंक्शन बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. ६२ व्या फिल्मफेअर अवार्डच्या प्री-पार्टीत सोनम कपूर पोहोचली ती सुद्धा एकदम हटके अवतारात. मग काय,तिच्या स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले नसेल तर नवल.
सोनमचा स्टायलिश लूक बघून मीडियाचे कॅमेरेही तिच्याकडे वळले. फिल्मफेअर प्री-पार्टीत सोनम ब्लॅक कलरचा ड्रेस आणि कानात डिझायनर इअररिंग्ससह दिसली. तुला पार्टीबद्दल अशी कुठली एक गोष्ट आवडते आणि कुठली गोष्ट आवडत नाही? असा प्रश्न मग तिला विचारला गेला. यावर सोनमने काय उत्तर दिले माहितीयं? मला पार्टीसाठी मेकअप करणे आणि तयार होणे अतिशय आवडते. पण पार्टीनंतर मेकअप उतरवणे आणि कपडे बदलण्याचा प्रचंड कंटाळा येतो, असे सोनम म्हणाली.सोनमचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. गत १३ तासांत २० हजारांवर लोकांनी तो पाहिला आहे. यातील सोनमचे उत्तर ऐकून कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्यात. एका युजरने लिहिले, तुला फक्त पार्टीसाठी तयार होणे आवडते, यात काही नवल नाही. तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होते.एकंदर काय,सोनमला बॉलिवूडची फॅशनिस्टा का म्हणतात, याचेच उत्तर सोनमने अप्रत्यक्ष दिले. पार्टीसाठी सजणे आवडते म्हटल्यावर त्यात सगळे आलेच.
गतवर्षी सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा सिनेमा प्रचंड गाजला. नीरजा भनोट नामक हवाईसुंदरीच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा सोनमच्या करिअरमधील टर्निंग पॉईन्ट ठरला. बिग बजेट सिनेमांच्या तुलनेत फार कमी स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर उल्लेखनीय कामगिरी केले.