बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्री आहेत सोनम कपूरच्या बेस्ट फ्रेंडस, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 15:35 IST2018-05-14T09:51:01+5:302018-05-14T15:35:57+5:30

सोनम कपूर लग्नानंतर तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगच्या रिलीजची वाट बघतेय. या चित्रपटा तिच्यासोबत करीना कपूर खान, स्वरा ...

Sonam Kapoor's Best Friends, Click Here To Know | बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्री आहेत सोनम कपूरच्या बेस्ट फ्रेंडस, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्री आहेत सोनम कपूरच्या बेस्ट फ्रेंडस, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

नम कपूर लग्नानंतर तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगच्या रिलीजची वाट बघतेय. या चित्रपटा तिच्यासोबत करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या मुख्य भूमिका आहे. सोनमला एका इंटरव्हु दरम्यान इंडस्ट्रीमधील तिच्या खास मैत्रिणीची नाव विचारण्यात आलीय. यावर करीनाने जॅकलिन फर्नांडिस, करीना कपूर आणि स्वरा भास्कर तिच्या जवळच्या मैत्रिणी असल्याचे सांगितले. सोनमच्या लग्नाच्या दरम्यान ही बाब ही प्रकर्षाना जाणवले कारण सोनमच्या प्रत्येक सेरेमनीत तिच्या या मैत्रिणी आवर्जून हजर होत्या. मोठ्या उत्साहानी त्यांनी सोनमच्या लग्नात सहभाग घेतला. ऐवढेच नाही तर करीना आपल्या 18 महिन्यांचा तैमूर अली खानला घेऊन सोनमच्या लग्नात आली होती. 

ALSO READ :  हातावरची मेहंदी निघाली नसतानाही सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत कान्सला निघाली...

8 मे रोजी लग्न झाल्यानंतर 12 मे रोजी सोनम दिल्ली गेली होती त्यानंतर ती आता नवरा आनंद अहुजासोबत कान्ससाठी सुद्धा रवाना झाली आहे. यंदा मात्र तिच्यासोबत तिचा पती आनंद अहुजा देखील असणार आहे. तो तिच्यासोबत रेड कार्पेटवरून रॅम्पवॉक करणार आहे याचा तिला सर्वांत जास्त आनंद वाटतो आहे. तिच्यासोबतच तिचे फॅन्स देखील या बॉलिवूडच्या कपलला रॅम्पवॉक करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात करीनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.  हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करीना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे. 1 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Sonam Kapoor's Best Friends, Click Here To Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.