सोनम कपूरचा हा अवतार पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:20 IST2016-05-26T11:50:37+5:302016-05-26T17:20:37+5:30
सोनम कपूर तिची स्टाईल आणि ड्रेसिंग सेंससाठी बॉलिवूडमध्ये बरीच लोकप्रीय आहे. अलीकडे कान फिल्म फेस्टिवलमधील तिच्या लूकची बरीच प्रशंसा ...

सोनम कपूरचा हा अवतार पाहाच!!
स नम कपूर तिची स्टाईल आणि ड्रेसिंग सेंससाठी बॉलिवूडमध्ये बरीच लोकप्रीय आहे. अलीकडे कान फिल्म फेस्टिवलमधील तिच्या लूकची बरीच प्रशंसा झाली. पण यानंतर काल बुधवारी कशिश मुंबई इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिवलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सोनमचा अवतार पाहून सगळेच चाट पडलेत. होय,उंच नेसलेली साडी आणि त्यावर काळे बूट..सोनमने एनविला मिश्राची खादी लाइनर साडी नेसली होती. सोबतच संगीता बूचर हिचे इयररिंग आणि अपालाची रिंग कॅरी केले होते. हे सगळे ठीक होते. पण या साडीसोबत तिने कॅरी केलेल्या काळ्या बूटांनी सगळ्यांना अचंबित केले. या ओपनिंग सेरेमनीमध्ये हॉलिवूड अभिनेता इयान मॅक्केलन, सिंगर सोना महापात्रा, कुणाल कपूर आदींनी हजेरी लावली.
![]()