सोनम कपूर म्हणाली, स्वरा भास्करला पुरेशी ओळख नाही मिळाली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 13:54 IST2017-03-04T06:29:21+5:302017-03-04T13:54:17+5:30

‘रांझणा’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमांमध्ये एकत्र काम करणाºया सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्यातील मैत्री सर्वश्रृत ...

Sonam Kapoor said, Swara Bhaskar did not get enough recognition! | सोनम कपूर म्हणाली, स्वरा भास्करला पुरेशी ओळख नाही मिळाली !

सोनम कपूर म्हणाली, स्वरा भास्करला पुरेशी ओळख नाही मिळाली !

ांझणा’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमांमध्ये एकत्र काम करणाºया सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. बºयाचदा या दोघींना अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र बघितले आहे. त्याचबरोबर जेव्हा-केव्हाही या दोघींना एकमेकींचे कौतुक करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी तोंडभरून एकमेकींचे कौतुकही केले आहे. असेच कौतुक पुन्हा एकदा सोनमने स्वराचे केले आहे. 

सोनम म्हणाली की, स्वरा एक उत्तम अभिनेत्री आहे. मात्र अशातही तिला हवी तेवढी ओळख मिळालेली नाही. गेल्या वर्षी रिलिज झालेला ‘निल बटे सन्नाटा’ हा एकमेव उत्कृष्ट सिनेमा ठरला होता. जर हा सिनेमा तुम्ही बघितला असेल तरच खºया अर्थाने तुम्हाला नारीवाद समजू शकेल. मात्र यातही स्वराच्या बाबतीत निराशाच समोर आल्याचेही सोनमने म्हटले. 



सध्या स्वरा तिच्या ‘अनारकली आॅफ आरा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमातील डिलीट केलेले काही बोल्ड सिन्स लीक झाले होते. याविषयी जेव्हा सोनमला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला हा सिनेमा बघण्याची संधी मिळाली, जेव्हा मी त्यातील स्वराचे काम बघितले तेव्हा मला रडू कोसळले. त्याचबरोबर सिनेमाची कथा आणि स्वराचा अभिनय बघून मी दंग राहिले, असेही सोनम म्हणाली. 

स्वरा आणि सोनम रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात एकत्र बघावयास मिळणार आहेत. या सिनेमात करिना कपूर प्रमुख भूमिकेत आहे. सध्या स्वरा तिच्या ‘अनारकली आॅफ आरा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडिया जबरदस्त हिट ठरत आहे. विशेष म्हणजे स्वराने तिच्या या सिनेमाचा पहिले ट्रेलर मैत्रिण सोनमबरोबरच रिलिज केला होता. त्यावेळी सोनमने स्वराचे कौतुक केले होते. 

Web Title: Sonam Kapoor said, Swara Bhaskar did not get enough recognition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.