Sonam Kapoor Pregnant: सोनम कपूर लवकरच होणार आई, गुड न्यूज समजताच करीना कपूर करतेय स्पेशल प्लानिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:16 IST2022-03-22T17:16:25+5:302022-03-22T17:16:52+5:30
Sonam Kapoor: सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर पती आनंद आहुजासोबतचा फोटो शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे.

Sonam Kapoor Pregnant: सोनम कपूर लवकरच होणार आई, गुड न्यूज समजताच करीना कपूर करतेय स्पेशल प्लानिंग
बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor)ने नुकतेच तिच्या लाखो चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रेग्नेंट असलेल्या सोनम कपूरने अखेर ती लवकरच आई होणार असल्याचा खुलासा केला आहे. सोनमने तिच्या इन्स्टाग्रामवर पती आनंद आहुजा (Anand Ahuja)सोबतचा फोटो शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोंमध्ये बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. सोनमने गुड न्यूज दिल्यानंतर तिची मैत्रिण करीना कपूर खानही खास प्लानिंग करते आहे.
करीना कपूरला सोनम कपूर आई होणार असल्याचे समजल्यावर तिच्या आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिने लिहिले की 'वुहू तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे, मुलांसोबत खेळण्याची प्रतीक्षा करू शकत नाही...'. सोनम कपूर आणि बेबोची मैत्री १५ वर्षे जुनी आहे. सोनम कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रिया कपूर यांचा कपूर गर्ल्स नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. अनेकदा त्या ग्रुपमधील प्रत्येकजण आपापसात फोटो पाठवत राहतो आणि आठवण काढत राहतो. आम्ही सुरक्षित जागेत आहोत. सोनम कपूर आणि करीना कपूर यांनीही 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.
केवळ करीना कपूरच नाही तर वाणी कपूर, अंशुला, खुशी, अबू जानी, जान्हवी कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी सोनमला अभिनंदन केले आहे. एकता कपूर, अनन्या पांडे, भावना पांडे, करण बुलानी, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, सोफी चौधरी, जान्हवी कपूर या सगळ्यांनीच खूप आनंद व्यक्त केला आहे.