अरबपती बिझनेसमॅनसोबत सोनम कपूर करणार लग्न; अनुष्काप्रमाणेच करणार शाही विवाह!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 01:20 PM2017-12-23T13:20:38+5:302017-12-23T21:34:53+5:30

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इटली येथे थाटामाटात लग्न केल्यानंतर दिल्लीत शाही रिसेप्शन ...

Sonam Kapoor to marry billionaire businessman; Royal marriage to do like Anushka! | अरबपती बिझनेसमॅनसोबत सोनम कपूर करणार लग्न; अनुष्काप्रमाणेच करणार शाही विवाह!

अरबपती बिझनेसमॅनसोबत सोनम कपूर करणार लग्न; अनुष्काप्रमाणेच करणार शाही विवाह!

googlenewsNext
राट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इटली येथे थाटामाटात लग्न केल्यानंतर दिल्लीत शाही रिसेप्शन देणारे विरुष्का आता मुंबईतील ग्रॅण्ड रिसेप्शनच्या तयारीला लागले आहेत. एकूणच अनुष्काचे लग्न बॉलिवूडमधील सर्वांत महागडे आणि लोकप्रिय लग्न ठरले आहे. दरम्यान, आता अनुष्काच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी बॉलिवूडमधील आणखी एक चेहरा समोर आला आहे. होय, अभिनेता अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

गेल्या काहीकाळापासून अभिनेता अनिल कपूरची मुलगी एका अरबपती बिझनेसमॅनला डेट करीत आहे. बºयाचदा सोनमला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बघण्यात आले आहे. सोनम गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली बेस्ड बिझनेसमॅन आनंद आहुजा याला डेट करीत आहे. या दोघांना बºयाचदा विदेशात व्हेकेशन एन्जॉय करताना बघण्यात आले आहे. सूत्रानुसार, सोनम आणि आनंद २०१८ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. लग्नासाठी दोघांनी जोधपूरमध्ये लोकेशनही बुक केल्याची माहिती समोर येत आहे. याच ठिकाणी सर्व लग्नविधी पार पडणार आहेत. 



आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, सोनमचे लग्नही अनुष्काच्या लग्नाप्रमाणेच शाही पद्धतीने पार पडेल. 

दरम्यान, २०१८ मध्ये अनिल कपूरच्या परिवारात दोन विवाह होणार आहेत. त्यामध्ये सोनमचा कझिन मोहित मारवाह फेब्रुवारीमध्ये आपली लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अंतरा मोतीवाला हिच्याशी लग्न करणार आहे. हा विवाहसोहळा दुबईमध्ये पार पडण्याची शक्यता आहे, तर याच वर्षांत सोनमही तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनमच्या लग्नाची आतापासूनच तयारी केली जात आहे. 

Web Title: Sonam Kapoor to marry billionaire businessman; Royal marriage to do like Anushka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.