सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासह करणार साखरपुडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 11:06 IST2017-05-10T05:10:16+5:302017-05-10T11:06:45+5:30
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या कायम चर्चा रंगत असतात. सेलिब्रिटींनी याबाबत कितीही नकार दिला तरी याविषयी जाणून घेण्याची रसिकांना ...

सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासह करणार साखरपुडा?
ब लिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या कायम चर्चा रंगत असतात. सेलिब्रिटींनी याबाबत कितीही नकार दिला तरी याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.आता अशाच एका सेलिब्रिटीच्या लिंकअपच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगल्यात. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे सोनम कपूर होय, सोनम तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगतायेत. काही दिवसांपासून सोनम आणि आनंदच्या रिलेशनशीपला घेऊन अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावर सोनम चांगलीच वैतागली होती. तिची आनंद आहुजा बरोबरच्या रिलेशनशीपच्या चर्चांबाबत तिने तिच्या पीआर टीमला चांगलेच खडसावलेही होते.मीडियामध्ये येणा-या लिंक अपच्या चर्चा पूर्णपणे बंद करण्यास तिने तिच्या पिअार टीमला सांगितले होते.खरेतर लंडनमध्ये झालेल्या अनिल कपूरच्या 60व्या बर्थ डे सेलिब्रेशनला आनंद आहुजाही उपस्थित होता. त्यावेळी या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत आल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. खरेतर तेव्हापासून सोनम कपूरच्या या रिलेशनशीपची चर्चा जोर धरू लागली होती. जेव्हा जेव्हा सोनमला तिच्या या रिलेशनशीपबदद्ल मीडियाकडून प्रश्न विचारले जायचे यांवर सोनमकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळायेच नाही. मात्र आता एका मीडिया रिपोर्टनुसार सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासह लवकरच साखपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगतायेत.नेहमीप्रमाणे सोनमकडून यांवर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले तरीही हे दोघेही याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचेही बी-टाऊनमध्ये बोलले जात आहे.