सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो समोर, लाईम ग्रीन लेहेंग्यात दिसली सुंदर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:24 IST2026-02-09T10:17:44+5:302026-02-09T10:24:01+5:30
सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

सोनम कपूरच्या बेबी शॉवरचे फोटो समोर, लाईम ग्रीन लेहेंग्यात दिसली सुंदर, पण...
बॉलिवूडची 'स्टाईल आयकॉन' सोनम कपूर आणि ती आनंद आहुजा यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. सोनम दुसऱ्यांदा आई होणार असून काल तिचं डोहाळजेवण झालं. या खाजगी कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करीना कपूर खान, शनाया कपूर, भूमी पेडणेकर, शबाना आजमी यांसह काही सेलिब्रिटींनी सोहळ्यात सामील होऊन आनंद द्विगुणित केला. सोनम कपूरच्या आऊटफिटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सोनमने या सोहळ्यासाठी लाईम ग्रीन रंगाचा अत्यंत सुंदर असा फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला लहंगा परिधान केला होता. यामध्ये तिने बेबी बंप पूर्णपणे रिव्हील केलेला दिसत आहे. केसांचा नीटनेटका अंबाडा, गळ्यात जड हार, मॅचिंग कानातले आणि हातात बांगड्या असा तिचा लूक अत्यंत राजेशाही वाटत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोनमचा 'प्रेग्नन्सी ग्लो' स्पष्टपणे दिसून येत होता.

सोनमने अतिशय आत्मविश्वासाने आणि प्रेमाने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. तर काहींनी तिच्या या स्टाईलवरुन तिला ट्रोलही केलं आहे. 'आधी बेबी बंप दाखवायचं आणि नंतर मुलांचे चेहरे लपवायचे' असं म्हणते एका नेटकऱ्याने सेलिब्रिटींना अप्रत्यक्षपणे सुनावलंच आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. तर २०२२ साली सोनमने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव वायू ठेवण्यात आलं. सोनम आता वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होण्यासाठी उत्सुक आहे.