​अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’मध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 10:23 IST2017-01-11T19:55:27+5:302017-01-12T10:23:44+5:30

अक्षय कुमारने २०१७ या वर्षात प्रदर्शित होणाºया चित्रपटांची नावे नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी अक्षयकु मारने आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर ...

Sonam Kapoor and Radhika Apte in Akshay Kumar's 'Padman' | ​अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’मध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे

​अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’मध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे

्षय कुमारने २०१७ या वर्षात प्रदर्शित होणाºया चित्रपटांची नावे नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी अक्षयकु मारने आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केली होती. यातील एका नावाने सर्वांना आश्चर्य वाटले होते. हे नाव होते पॅडमॅन या चित्रपटाचे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित केला जाईल असेही सांगण्यात आले होते. हा चित्रपट कुणावर आधारित आहे, यात काय दाखविले जाईल यावर चांगलीच चर्चा रंगली असतानाच ‘पॅडमॅन’मध्ये सोनम कपूर व राधिका आपटे या दोन अभिनेत्री दिसणार आहेत असे सांगण्यात येत आहे. 

‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. अक्षयच्या या चित्रपटासाठी अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची निवड झाली आहे. सोनमने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. तर दुसरीकडे राधिका आपटेने देखील पॅडमॅनचा चित्रपटासंबधीचा एक फोटो रिट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले.

सोनम कपूरने अक्षय कुमारच्या प्रेस्टेजिअस प्रोजेक्टचा भाग असल्याचे सांगितले आहे. राधिका आपटेने अक्षय कुमारने केलेले पॅडमॅनचे पोस्टर रिट्विट करीत थँक यू असे लिहले आहे. यावरून दोघींची निवड या चित्रपटात झाली असल्याचे दिसते. 

अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा पॅडमॅन हा याच मालिकेतील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बल्की करीत असून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. 

radhika apte

Web Title: Sonam Kapoor and Radhika Apte in Akshay Kumar's 'Padman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.