बोल्ड सीन करताना एकमेकात हरवले हीरो-हिरोईन, राहिलं नाही भान, अखेर दिग्दर्शकाने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:59 IST2022-12-29T15:57:40+5:302022-12-29T15:59:33+5:30
Sonali Raut & Yuvraaj Parashar: लव्ह लाईफ अँड स्क्रू अप्सच्या सेटवर असाच प्रकार घडलाय. तिथे एक इंटिमेंट सीनचं चित्रिकरण सुरू होते. अभिनेत्री सोनाली राऊत आणि युवराज पराशर यांच्यावर हा सिन चित्रीत केला जात होता.

बोल्ड सीन करताना एकमेकात हरवले हीरो-हिरोईन, राहिलं नाही भान, अखेर दिग्दर्शकाने...
अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री चित्रिकरण करताना आपल्या अभिनयामध्ये एवढे हरवून जातात की दिग्दर्शकाने कधी कट म्हटलं याचं त्यांना भानही राहत नाही. कधी अभिनय करायचा आहे. कधी थांबायचं आहे, हेही त्यांना कळत नाही. हल्लीच लव्ह लाईफ अँड स्क्रू अप्सच्या सेटवर असाच प्रकार घडलाय. तिथे एक इंटिमेंट सीनचं चित्रिकरण सुरू होते. अभिनेत्री सोनाली राऊत आणि युवराज पराशर यांच्यावर हा सिन चित्रीत केला जात होता. हा सिन चित्रित करत असताना सोनाली आणि युवराज दोघेही सुरुवातीला काहीसे नर्व्हस होते. कारण दोघांनाही हा सिन शॉवरखाली चित्रित करायचा होता.
दोघांनीही दिग्दर्शकांना विनंती केली की, ते एकाच शॉटमध्ये संपूर्ण सीन चित्रित करतील. दिग्दर्शकानेही ही अट मान्य केली. तसेच जोपर्यंत ते कट म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांनी अभिनय थांबवता कामा नये, असे त्यांना सांगितले. कॅमेरा रोल झाला आणि शॉवर सुरू झाला. त्यानंतर सोनाली आणि युवराज सिनमध्ये एवढे हरवले की, त्यांना कशाचेही भान राहिले नाही. दिग्दर्शकांनी कॅमेरामनला शूटिंग सुरू ठेवण्यास सांगितले कारण त्यांना सिनमध्ये हवे असलेले फुटेज मिळत होते.
जेव्हा दिग्दर्शकांना वाटले की, त्यांना पुरेसे फुटेज मिळाले आहे. तेव्हा त्यांनी दोन्ही कलाकारांकडे जाऊन त्यांच्या कानात कट म्हटले. सोनाली आणि युवराजला या शब्दांनंतर भानावर आले. सिन शूट करताना त्यांना आपण काय करतोय याचे भान राहिले नव्हते. ही सिरिज पुढील वर्षी ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये झिनत अमानसुद्धा अभिनय करताना दिसणार आहे.