सोनाली ब्रेंदेच्या एकुलत्या एका लेकाला पाहिलं का? एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:47 IST2026-01-15T15:37:52+5:302026-01-15T15:47:37+5:30
बॉलिवूडला मिळणार नवा 'हँडसम हंक'? सोनाली बेंद्रेच्या मुलाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सोनाली ब्रेंदेच्या एकुलत्या एका लेकाला पाहिलं का? एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही!
Sonali Bendre Son Ranveer Behl Viral Video : हिंदी चित्रपटसृष्टील ९० दशकात अनेक अभिनेत्रींनी आपला साधेपणा, सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लाखो करोडो सिनेरसिकांना वेड लावले होते. आजदेखील त्या अभिनेत्रींचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. बॉलिवूडमधील साधी सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आजही सोनाली सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच सोनाली तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीसोबत तिचा मुलगा रणवीर दिसत असून, त्याला पाहून चाहते थक्क झाले आहेत.
'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये सोनाली तिचा मुलगा रणवीर बहलसोबत दिसली. निळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्समध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. पण सर्वांचे लक्ष वेधले ते तिच्या उंच आणि देखण्या मुलाने. १९ वर्षांचा रणवीर आता पूर्णपणे बदलला असून त्याचा डॅशिंग लूक पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, "सोनालीचा मुलगा इतका मोठा झाला? तो तर अगदी हिरो दिसतोय". तर दुसऱ्याने लिहिले, "आई आणि मुलाची जोडी खूपच छान आहे".
रणवीर एकुलता एक मुलगा
कॅन्सरसारख्या आजारावर मात करून सोनाली बेंद्रे हिने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलंय. आज सोनाली अनेक जाहिराती, रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय. तिच्या या कठीण काळात तिचा नवरा गोल्डी बहल यांनी सोनालीला खूप साथ दिली होती. गोल्डी आणि सोनाली यांची लव्हस्टोरीही आधी भांडण मग प्रेम अगदी सिनेमात दाखवतात तशी फिल्मी आहे. १२ नोव्हेंबर २००२ रोजी दोघांनी लग्न केलं होतं. गोल्डी हे एक सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. रणवीर हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.