"कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली..." सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव, महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:08 IST2025-06-01T13:08:30+5:302025-06-01T13:08:55+5:30

सोनाली बेंद्रेने शेअर केला कर्करोगाचा अनुभव; महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला

Sonali Bendre Cancer Journey Advice To Women | Cancer Early Detection | Farah Khan | "कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली..." सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव, महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला

"कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली..." सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव, महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला

Sonali Bendre Advice To Women About Cancer : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ९० च्या दशकातील लोकप्रिय नायिकांपैकी एक होती. सोनालीने बऱ्याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला.  मध्यंतरीच्या काळात सोनालीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. काही क्षणांसाठी ती हादरून गेली हाेती. पण नंतर पुन्हा उमेदीने उभी राहिली आणि सगळे औषधोपचार नेटाने पुर्ण करून आज त्या आजारातून ती पुर्णपणे बाहेरसुद्धा आली आहे. तिच्या संपूर्ण आजारपणाच्या काळात तिची जिद्द कायम होती. ती जशी आजही टिकून आहे. अशातच सोनालीनं कर्करोगाबद्दल महिलांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. सोनालीने दिलेला हा सल्ला प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. घर, ऑफिस, कुटुंब, जबाबदाऱ्या यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक स्त्रिया असतात. त्याच्यासाठी सोनालीचा हा सल्ला एक 'अलार्म' आहे.

नुकतंच फराह खान (Farah Khan) ही सोनाली बेंद्रेच्या घरी पोहचली होती. फराह तिच्या युट्यूब चॅनलवर कुकिंग शो करते, ज्यात ती सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि त्यांची स्पेशल रेसिपी दाखवते. यावेळी दोघींनी गप्पा मारल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी फराह म्हणाली,"तू खूप मोठा धक्का दिला होता, मी तर तेव्हा खूप घाबरले होते, पण सोनाली तुझ्याएवढी निडर मुलगी मी अजून पाहिली नाही. पण, आता तुला पुन्हा आधीसारखं पाहून बरं वाटतंय. तुला आज सगळ्या महिलांना काही सल्ला द्यायचा असेल तर काय सांगशील? असं विचारलं.

यावर सोनालीने महत्त्वाचा अनुभव शेअर केला. सोनालीनं महिलांना स्वत:कडे प्रकृतीकडे दुर्लक्ष नक करता  नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला.  ती म्हणाली, "आपण असे म्हणतो की आज वेळ नाही, नंतर जाऊ. मला त्रास होत होता, तेव्हा डॉक्टरांकडे जात होते.  डॉक्टरसुद्धा ही औषधं घ्या, होऊन जाईल असं सांगायचे. मला असं वाटतं तेव्हा आणखी लक्ष द्यायला हवं होतं. आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. मला कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली ती म्हणजे जेवढ्या लवकर निदान होईल, तेवढं जास्त चांगलं असतं, जीव वाचतो. त्यामुळे नियमित तपासणी करणं गरजेच आहे". 
 

Web Title: Sonali Bendre Cancer Journey Advice To Women | Cancer Early Detection | Farah Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.