​ सोनाक्षी लहानपणी करायची ‘गंदी बात’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 17:37 IST2016-09-07T12:07:12+5:302016-09-07T17:37:12+5:30

सोनाक्षी सिन्हाच्या ‘आर. राजकुमार’ या चित्रपटातील  ‘गंदी बात’ हे गाणे तुम्ही ऐकले असेलच. हे गाणे चांगलेच लोकप्रीय झाले होते. ...

Sonakshi's childhood 'dirty talk' !! | ​ सोनाक्षी लहानपणी करायची ‘गंदी बात’!!

​ सोनाक्षी लहानपणी करायची ‘गंदी बात’!!

नाक्षी सिन्हाच्या ‘आर. राजकुमार’ या चित्रपटातील  ‘गंदी बात’ हे गाणे तुम्ही ऐकले असेलच. हे गाणे चांगलेच लोकप्रीय झाले होते. पण या चित्रपटाआधी सोनाक्षीने लहानपणी एक ‘गंदी बात’ केली होती. आता सोनाने असे काय केले असेल, या विचारात तुम्ही पडला असाल.  तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. सोनाक्षीला लहानपणी चीटिंग करण्याची वाईट सवय लागली होती. ती गणितात बरीच कच्ची होती. त्यामुळे परिक्षेत सोनाक्षीने अनेकदा चीटिंग करण्याचे प्रयत्न केले. पण एकदा गणिताच्या शिक्षकाने सोनाक्षीला चीटिंग करताना पकडले. आता आपल्याला चांगलीच शिक्षा मिळेल, असे सोनाला त्यावेळी वाटले होते. शिक्षकांनी लगेच सोनाच्या आईला शाळेत बोलवून घेतले. यामुळे तर सोना जाम घाबरली. पण शिक्षकांनी सोनाला आईसमोर न रागावता  एकट्यात नेले आणि तिथे तिला समजावले. शिक्षकांनी समजवल्याानंतर सोनाला तिच्या कृत्याचा पश्चाताप झाला. यातून सोनाने एक धडा घेतला, तो म्हणजे, जे काही करायचे तर प्रामाणिकपणे करायचे...सो क्यूट ना!!

Web Title: Sonakshi's childhood 'dirty talk' !!