"आम्हा दोघांनाही मुलं आवडतात...", सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल देणार गोड बातमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 11:41 IST2024-09-16T11:40:58+5:302024-09-16T11:41:49+5:30

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Shares Baby Planning After 4 Months Of Marriage | "आम्हा दोघांनाही मुलं आवडतात...", सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल देणार गोड बातमी?

"आम्हा दोघांनाही मुलं आवडतात...", सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल देणार गोड बातमी?

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Baby Planning : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. गेल्या जूनमध्ये सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकली.  दोघांनी एका खाजगी समारंभात नोंदणीकृत विवाह केला. लग्नाआधी ते सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. आता हे कपल कधी गुड न्यूज देणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

नुकतंच एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने बेबी प्लॅनिंगबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "आमचे आई-वडील हे आम्हाला बेबी प्लॅनिंगबद्दल विचारत नाहीत. मग हे काय? आता तर फक्त आम्ही दोघे सोबत आहोत आणि याचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. आम्हा दोघांनाही मुलं खूप आवडतात". तर झहीर म्हणतो, 'जेव्हा मूल जन्माला येईल, तेव्हा आमचं सर्व काही त्याच्याभोवती असेल. नुकतंच आम्ही लग्न केलं आहे. त्यामुळे सध्या तरी आम्हाला वैवाहिक जीवनाचाआनंद घ्यायचा आहे. सध्या आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत". 


सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती OTT वर रिलीज झालेल्या 'काकुडा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यासोबतच सोनाक्षी सिन्हा ही संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. याशिवाय ती 'निकिता रॉय' आणि 'द बुक ऑफ डार्कनेस'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Sonakshi Sinha Zaheer Iqbal Shares Baby Planning After 4 Months Of Marriage