"माझी एकुलती एक मुलगी...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 10:37 IST2024-06-20T10:36:33+5:302024-06-20T10:37:17+5:30

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडत प्रतिक्रियी दिली आहे.

sonakshi sinha wedding shatrughna sinha break silence on not attending daughters wedding rumors | "माझी एकुलती एक मुलगी...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

"माझी एकुलती एक मुलगी...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सोनाक्षीची लगीनघाई सुरू आहे. बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर सोनाक्षी सात फेरे घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. २३ जूनला सोनाक्षी आणि जहीर विवाहबंधनात अडकणार आहेत. पण, सोनाक्षीच्या कुटुंबीय मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. सोनाक्षीचा भाऊ लव्ह आणि तिच्या आईने अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडत प्रतिक्रियी दिली आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी 'झुम'शी संवाद साधला. लेकीच्या लग्नाबाबत ते म्हणाले, "मला सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे? माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचं हे आयुष्य आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मला तिचा अभिमान आहे. मी नक्कीच लग्नाला उपस्थित राहणार आहे. सोनाक्षीला तिचा लाइफ पार्टनर निवडायचा पूर्ण अधिकार आहे. तिच्या इच्छेनुसार ती लग्नही करू शकते. मी आतादेखील मुंबईत आहे. मी केवळ त्यांची ताकद म्हणून नाही तर त्यांचं सुरक्षाकवच म्हणून इथे आहे. सोनाक्षी आणि जहीरला एकत्र आयुष्य जगायचं आहे. ते एकत्र खूप चांगले दिसतात". 

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर २३ जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईत अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २० जूनला सोनाक्षी आणि जहीरचा हळदी समारंभ पार पडणार आहे. 

Web Title: sonakshi sinha wedding shatrughna sinha break silence on not attending daughters wedding rumors