दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 12:29 IST2018-10-26T12:25:41+5:302018-10-26T12:29:36+5:30

टी-सीरिज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या आमिर खानच्या मुघल सिनेमाबाबतच्या चर्चा रोज सुरुच आहेत. रोज नवे खुलासे या सिनेमाबाबत होताना दिसतायेत.

Sonakshi Sinha out of Aamir Khan's Mughal after Deepika Padukone's entry? | दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट?

दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट?

ठळक मुद्दे सोनाक्षी सिन्हाने स्वत:ला मुघलपासून दूर केले आहेदीपिकाची भूमिका ही सोनाक्षी सिन्हापेक्षा मोठी आहे

टी-सीरिज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या आमिर खानच्या मुघल सिनेमाबाबतच्या चर्चा रोज सुरुच आहेत. रोज नवे खुलासे या सिनेमाबाबत होताना दिसतायेत. नुकत्याच मिळाल्या बातमीनुसार या मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे.   

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार आमिर खानने मुघलच्या निमार्त्यांना दीपिका पादुकोणचा नावाचा विचार करण्यास सांगितले आहे. त्याला वाटते या सिनेमासाठी ती एकदम परफेक्ट आहे.  यानंतर अशी माहिती मिळतेय की, सोनाक्षी सिन्हाने स्वत:ला मुघलपासून दूर केले आहे. मेकर्सना या सिनेमात सोनाक्षीला घ्यायचे होते. सोनाक्षीने यासिनेमासाठी होकारदेखील दिला होता. मात्र आता अचानक दीपिकाचे नाव समोर येतेय.  

रिपोर्टनुसार दीपिकाची भूमिका ही सोनाक्षी सिन्हापेक्षा मोठी आहे. त्यामुळे सोनाक्षी सिनेमात सेकेंड लीड म्हणून दिसेल तर दीपिका मुख्य भूमिकेत. त्यामुळे सोनाक्षी हा सिनेमा करण्यासाठी नकार देणार असल्याची चर्चा आहे. अजूनपर्यंत निर्मात्यांना सोनाक्षीने नकार दिलेला नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षीला 'मोगुल'मधली भूमिका आवडली आहे, त्यामुळे तिला अंतिम निर्णय घेण्यासाठी थोडावेळ लागतोय.  

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होतो. ‘मुघल’चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याजागी राजकुमार हिराणी आता या सिनेमाची धुरा सांभाळत आहेत.  
 

Web Title: Sonakshi Sinha out of Aamir Khan's Mughal after Deepika Padukone's entry?