‘नको ती’ मागणी करणाऱ्याला सोनाक्षी सिन्हाचं गजब उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 16:33 IST2021-08-29T16:30:20+5:302021-08-29T16:33:01+5:30
एका युजरने सोनाक्षीकडे बिकिनी फोटोंची मागणी केली. त्याच्या या मागणीवर सोनाक्षीने असं काही केलं की, त्याची बोलती बंद झाली...

‘नको ती’ मागणी करणाऱ्याला सोनाक्षी सिन्हाचं गजब उत्तर
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ( Sonakshi Sinha) बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ म्हणतात ते उगाच नाही. ‘दबंग’ सिनेमातून फिल्मी करिअरची सुरूवात करणारी सोना स्वभावानंही ‘दबंग’ आहे. होय, अलीकडे तिनं जे काही केले, त्यावरून तुम्हालाही सोनाच्या या स्वभावाची खात्री पटावी. अलीकडे नको ती मागणी करणा-या एका ट्रोलरला तिनं चांगलंच सुनावलं.
तर त्याचं झालं असं की, सोनाक्षीने अलीकडे सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन केलं. या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नाला तिनं मनमोकळी उत्तरं दिलीत. याच सेशनदरम्यान काहींनी तिला ट्रोल करत, नको ते प्रश्नही विचारलेत. आता अशांना सोनाक्षी थोडीचं भीक घालणार?
एका युजरने या सेशनदरम्यानं काय करावं तर सोनाक्षीकडे बिकिनी फोटोंची मागणी केली. त्याच्या या मागणीवर सोनाक्षीने असं काही केलं की, त्याची बोलती बंद झाली. होय, तिने इंटरनेटवरचा एक बिकनीचा फोटो उचलला आणि तो लगेच शेअर केला.
एका युजरने असाच एक विचित्र प्रश्न केला. वजन कमी करण्यासाठी काय खाऊ? असं त्यानं विचारलं. सोनाने त्यालाही गजब उत्तर दिलं. ‘तू ना हवा खा....’, असं तिनं लिहिलं.
सोनाक्षी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. मात्र गेल्यावर्षी ती प्रचंड ट्रोल झाली होती. यानंतर तिने टिष्ट्वटरला रामराम ठोकला होता.
सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती डिजिटल डेब्यू करणार आहे. नेटफ्लिक्सच्या बुलबुज तारंग या सिनेमात ती दिसणार आहे. शेवटची ती सलमान खानच्या ‘दबंग 3’ या चित्रपटात दिसली होती.आत्तापर्यंत तिनं रावडी राठौड, सन आॅफ सरदार, लूटेरा, बॉस, हॉलीडे, तेवर, मिशन मंगल, खानदानी शफाखाना , आर.. राजकुमार अशा अनेक चित्रपटांध्ये काम केलं आहे.