​'या' व्यक्तीमुळे सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला वाट पाहायला लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:18 IST2017-09-18T09:48:58+5:302017-09-18T15:18:58+5:30

सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनाक्षी ही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सलमान खानने ...

Sonakshi Sinha gave Salman Khan a wait for the person | ​'या' व्यक्तीमुळे सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला वाट पाहायला लावली

​'या' व्यक्तीमुळे सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला वाट पाहायला लावली

नाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनाक्षी ही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सलमान खानने तिला चित्रपटसृष्टीत आणले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण दबंग या चित्रपटाद्वारे त्याने सोनाक्षीला पहिला ब्रेक दिला. यामुळे सोनाक्षी आणि सलमान खान यांची खूपच चांगली मैत्री आहे. सोनाक्षी नुकतीच सलमानसोबत दबंग कॉर्न्सटमध्ये थिरकताना आपल्याला दिसली. त्या दोघांनी दबंग या चित्रपटातील त्यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सोनाक्षीने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ती तिच्या कामात कितीही बिझी असली तरी  तिच्या कुटुंबाला ती सर्वाधिक प्राधान्य देते. तिने ही गोष्ट अनेकवेळा दाखवून देखील दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा भाऊ कुश सिन्हासाठी दबंग ३ या कॉर्न्सटमधील तिचा परफॉर्मन्स एक दिवसाने पुढे ढकलला. सलमान खान त्याच्या आघाडीच्या नायिकांसोबत सध्या लंडनमध्ये दबंग कॉर्न्सटमध्ये थिरकताना आपल्याला दिसत आहे. पण सोनाक्षी भावामुळे या कॉर्न्सटला एक दिवस उशिराने पोहोचली.
‘स्टार प्लस’वर ‘डॉटर्स डे’ निमित्ताने प्रेक्षकांना एक विशेष लघुपट पाहायला मिळणार आहे. हा लघुपट सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा बनवत आहे. या लघुपटात सोनाक्षीने काम करावे अशी कुशची इच्छा असल्याने त्याने या लघुपटात काम कऱण्यासाठी सोनाक्षीला  विनंती केली. पण सोनाक्षी सध्या तिच्या कामामध्ये प्रचंड व्यग्र आहे. ती काही चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासोबतच ओम शांती ओम या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. पण असे असूनही तिने भावासाठी लघुपटात काम करण्यास होकार दिला आणि तिच्या सध्याच्या शेड्युलमध्ये काही फेरबदल केले.
दबंगच्या कॉर्न्सटमध्ये तिला सलमान खानसोबत नृत्य सादर करायचे होते. पण भावाच्या लघुपटासाठी लंडनमधील एका दिवसाच्या कॉर्न्सटला तिला दांडी मारावी लागली. आपल्या भावाच्या लघुपटासाठी सोनाक्षीने मुंबईतील आपला मुक्काम एका दिवसाने वाढवला आणि नंतरच ती लंडनला रवाना झाली. यासंदर्भात तिने सांगितले, “या लघुपटासाठी वेळ काढणं गरजेचं आहे, असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या अन्य कार्यक्रमांच्या वेळापत्रकात थोडेसे बदल केले.”
या लघुपटात सोनाक्षी सिन्हा विविध रूपात दिसणार असून मुलींच्या हक्कांची जाणीव ती प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून देणार आहे.

Also Read : मॅनेजरसोबत होते सोनाक्षी सिन्हाचे अफेयर; सलमान खानच्या पार्टीत सामना होताच झाला तमाशा!

Web Title: Sonakshi Sinha gave Salman Khan a wait for the person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.