सोनाक्षी सिन्हा रॅपर बादशाहसोबत करणार गायनाची हौस पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:46 IST2017-02-21T10:16:21+5:302017-02-21T15:46:21+5:30

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला अभिनयाबरोबरच गायनाचा छंद असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले आहे. मग फंक्शन अवॉर्ड असो की एखादा रिअ‍ॅलिटी ...

Sonakshi Sinha full of singing with rapper king? | सोनाक्षी सिन्हा रॅपर बादशाहसोबत करणार गायनाची हौस पूर्ण?

सोनाक्षी सिन्हा रॅपर बादशाहसोबत करणार गायनाची हौस पूर्ण?

िनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला अभिनयाबरोबरच गायनाचा छंद असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले आहे. मग फंक्शन अवॉर्ड असो की एखादा रिअ‍ॅलिटी शो संधी मिळाली की, सोनाक्षी तिची गायनाची हौस पूर्ण करतेच. त्यातच तिने नुकताच रॅपर बादशाहसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने, त्याच्यासोबत ती एखाद्या अल्बममध्ये तर काम करीत नाही ना? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. 

सोनाक्षीने शेअर केलेला हा फोटो रेकॉर्डिंग स्टुडिओमधील असल्याने ती नक्कीच बादशाहसोबत नव्या अल्बमवर काम करीत असण्याची शक्यता आहे. फोटोमध्ये दोघांनीही काळ्या रंगाचे टीशर्ट परिधान केलेले असून, दोघांच्या डोक्यावर रॅपर स्टाइल टोपी आहे. सोनाक्षीने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘याची प्रतीक्षा करा!’ हा फोटो केवळ सोनाक्षीनेच शेअर केला असे नाही तर बादशाहनेदेखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



खरं तर रॅपर बादशाह आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. जेव्हा सोनाक्षी २०१४ मध्ये तिच्या ‘अकिरा’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीला गेली होती, तेव्हा बादशाहने तिची भेट घेतली होती. यावेळी बादशाहने दोघांच्या भेटीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हे दोघे मित्र एकत्र काम करण्याची शक्यता आहे. बादशाहाने नुकतेच ‘ओके जानू’मधील ‘हम्मा हम्मा’ आणि ‘ब्रदिनाथ की दुल्हनिया’मधील ‘तम्मा तम्मा’ या गाण्यांना रॅप दिला होता. 

तर सोनाक्षीविषयी सांगायचे झाल्यास लवकरच ती ‘नूर’ या सिनेमामध्ये बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत ‘इत्तेफाक’मध्ये ती बघावयास मिळणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली असून, दोघेही करण जोहरच्या पार्टीत एकत्र बघावयास मिळाले आहे. 

Web Title: Sonakshi Sinha full of singing with rapper king?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.