अखेर सोनाक्षी सिन्हाने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे शत्रुघ्न सिन्हांचा होणारा जावई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 10:29 IST2021-12-11T10:22:22+5:302021-12-11T10:29:22+5:30

Sonakshi Sinha News: सोनाक्षी सिन्हा अभिनेता Zaheer Iqbal याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र त्यांच्याकडून या नात्याबाबत मौन पाळण्यात येत होते. पहिल्यांदाच सोनाक्षीने झहीर इक्बालचे फोटो शेअर करून खास पोस्ट लिहिली आहे.

Sonakshi Sinha finally confesses her love, see who is the son-in-law of Shatrughan Sinha | अखेर सोनाक्षी सिन्हाने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे शत्रुघ्न सिन्हांचा होणारा जावई?

अखेर सोनाक्षी सिन्हाने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे शत्रुघ्न सिन्हांचा होणारा जावई?

मुंबई - बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा हिने अखेर प्रेमाची कबुली दिल्याचे संकेत मिळत आहेत. सोनाक्षीने जे नाते आतापर्यंत लपवून ठेवले होते. ते नाते आता सोनाक्षीने जाहीर केले आहे का, तिने तिचा जीवनसाथी निवडला आहे का? असे प्रश्न अनेक दिवसांपासून विचारले जात होते. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा सलमान खानच्या निकटवर्तीयासोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. मात्र हल्लीच तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोनाक्षीला तिचं प्रेम मिळाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र त्यांच्याकडून या नात्याबाबत मौन पाळण्यात येत होते. पहिल्यांदाच सोनाक्षीने झहीर इक्बालचे फोटो शेअर करून खास पोस्ट लिहिली आहे. तेव्हापासून या दोघांमधील नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

झहीर इक्बाल याचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस होता. या खास दिवशी सोनाक्षी सिन्हा हिने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सोनाक्षीने दोन फोटो शेअर केले होते. एका फोटोमध्ये सोनाक्षी ब्लॅक आऊटफिटमध्ये उभी राहून पाहत आहे. तर झहीर तिच्या शेजारी उभा आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांशी गमतीजमतीमध्ये लढताना दिसत आहेत.

तिने लिहिले की, या जगामध्ये मला सर्वात जास्त त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जगातील सर्वात चांगला माणूसही आहेस. असे कसे होऊ शकते? तू असा कसा आहेस? जन्म घेण्यासाठी शुभेच्छा, हॅप्पी बर्थडे. बाय!! याबरोबरच सोनाक्षीने #bestbestfriend #whattaguy हे टॅग्सही वापरले आहेत.

सोनाक्षीच्या या पोस्टवर तिचा मित्रपरिवार आणि फॅन्स खूप कमेंट्स करत आहेत. झहीरनेसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो लिहितो की, पण ती माझी चांगली मैत्रिण आहे. तसेच त्याने अनेक इमोजीसुद्धा शेअर केले आहेत. तसेच एका वेगळ्या कमेंट्समध्ये झहीरने लिहिले की, आता अधिकृतरीत्या मी तुला माझी हिरोईन म्हणू शकतो का? या कमेंट्सनंतर दोघांनीही आपले नाते इन्स्टा ऑफिशियल केल्याचा अंदाज फॅन्सकडून बांधला जात आहे. 

Web Title: Sonakshi Sinha finally confesses her love, see who is the son-in-law of Shatrughan Sinha