सोनाक्षी सिन्हा बनली नच बलियेच्या 8व्या सीझनची जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 15:43 IST2017-03-15T10:13:22+5:302017-03-15T15:43:22+5:30
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आपल्याला टीव्हीवर जजच्या खुर्चीवर बसलेली दिसणार आहे. रिअॅलिटी शो न बलिया सीझन 8ची परीक्षका ...
सोनाक्षी सिन्हा बनली नच बलियेच्या 8व्या सीझनची जज
ब लिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आपल्याला टीव्हीवर जजच्या खुर्चीवर बसलेली दिसणार आहे. रिअॅलिटी शो न बलिया सीझन 8ची परीक्षका बनणार आहे. नच बलिये शो जज करणे हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे असे सोनाक्षी सिन्हाने सांगितले आहे. मी याआधी लहान मुलांचा रिअॅलिटी शो जज केला आहे. मी लहान मुलांमध्ये खूप सहजरितीने मिक्स होऊऩ जाते त्यामुळे त्यांचा रिअॅलिटी शो जज करणे माझ्यासाठी तेवढे कठिण नव्हते. मात्र पहिल्यांदाच मी एक डान्स रिअॅलिटी शो जज करणार आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच नवीन आहे.
मी परीक्षण करताना माझ लक्ष असेल की एका जोडी म्हणून ती आपला परफॉर्मन्स कसा सादर करतात. एकमेकांना कस संभाळून घेतात. तसेच प्रत्येक जोडीमधला बॅलेन्स बघणे माझ्यासाठी उत्सुकतेचे असणार आहे. सोनाक्षी सध्या तिचा आगामी चित्रपट नूरला घेऊऩ खूप उत्साहित आहे. नूर हा चित्रपट आपल्यासाठी खूप स्पेशल असल्याचे तिने म्हटले आहे. सुनील सिप्पींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नूरमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या कराची यू आर किलिंग मी या कादंबरीवर आधारित आहे. 21 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नूरमध्ये सोनाक्षी खूप चॅलेजिंग भूमिकेत दिसेल याआधी ही सोनाक्षी अकीरामध्ये एक्शन करताना दिसली होती. नुकताच नूरचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाचे प्रमोशन करताना मी नेहमीच टेंशन फ्री असते असे सोनाक्षी म्हणाली.