सोनाक्षी आणि झहीरनं व्हिडीओ शेअर करत दिली 'गुड न्यूज', चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:28 IST2025-10-09T12:28:39+5:302025-10-09T12:28:54+5:30
सोनाक्षी आणि झहीरचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

सोनाक्षी आणि झहीरनं व्हिडीओ शेअर करत दिली 'गुड न्यूज', चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सात वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षीने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केले. सोनाक्षी आणि झहीरने अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर मुंबईमध्ये धमाकेदार पार्टी दिली होती. गेल्या जून महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्षही पुर्ण झालं. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आता नुकताच सोनाक्षी आणि झहीरचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
सोनाक्षी आणि झहीरनं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर सतत सुट्ट्यांचे फोटो शेअर करणाऱ्या या जोडीने आता मुंबईतील त्यांच्या स्वप्नातील नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
सोनाक्षीने तिच्या यूट्यूबवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
लग्नापूर्वीच खरेदी केले होते घर
सोनाक्षीने तिच्या नवीन व्लॉगमध्ये खुलासा केला की, ती आणि झहीर हे नव्या आलिशान घरात राहायला गेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घर त्यांनी लग्नानंतर नव्हे, तर लग्नाआधीच खरेदी केले होते. सोनाक्षी म्हणाली, "आमचे लग्न होऊन बराच काळ झाला आहे. आम्ही लग्नाच्या खूप आधीपासून प्रॉपर्टी खरेदी करायला सुरुवात केली होती आणि ती तशीच ठेवली होती. आम्ही लग्नानंतर सुरुवात करू ठरवलं होतं". घराचं इंटीरियर गेल्या नऊ महिन्यांत पूर्ण झाल्याची माहितीही तिने दिली.
लग्नाच्या १० दिवस आधी झाली पूजा
झहीर इक्बालने यावेळी खुलासा केला की, त्यांनी लग्नाच्या अगदी १० दिवस आधी त्यांच्या या नवीन घरात पूजा केली होती. सोनाक्षीने चाहत्यांना त्यांचे स्वयंपाकघर, हॉल दाखवला. दोघांच्या आवडीनुसार या घराची रचना करण्यात आली आहे.