सोनाक्षी आणतेयं ‘असली सोना’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 19:18 IST2016-04-05T02:18:44+5:302016-04-04T19:18:44+5:30
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान अढळ केले आहेच. आता सोनाक्षी आणखी एका कामासाठी सज्ज झाली आहे. होय, ...

सोनाक्षी आणतेयं ‘असली सोना’?
अ िनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान अढळ केले आहेच. आता सोनाक्षी आणखी एका कामासाठी सज्ज झाली आहे. होय, एका वृत्तानुसार, सोनाक्षी लवकरच स्वत:चे वेगळे फॅशन लेबल लॉन्च करणार आहे. या फॅशन लेबलचे नाव असेल ‘असली सोना’. योगायोग म्हणज इंस्टाग्रामवरील सोनाचे याच नावाने अकाऊंट आहे. सोनाक्षी अलीकडे फॅशन डिझाईनर अनिता डोंगरे हिच्यासाठी रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी सोना म्हणाली होती, मी नशीबाने अभिनेत्री झाले असेन पण फॅशन डिझाईनिंग हा कायम माझ्या आवडीचा प्रांत राहिला आहे. नशीबाने माझ्यासाठी काही वेगळ्या योजना केल्या होत्या. पण फॅशन डिझाईनिंगचा किडा सतत माझ्या डोक्यात वळवळत असतो. अभिनय आणि फॅशन यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. फॅशन हा माझ्या कामाचाच एक भाग आहे. पण कदाचित लवकरच मी फॅशन डिझाईनिंगही करताना दिसेल... तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, सोना फॅशन डिझाईनिंगमध्ये ग्रॅज्युएट झाली आहे. तेव्हा सोनाचे ‘असली सोना’ अस्सल निघो,हीच कामना करू या !!