‘भारत’च्या एपिसोडवर सोना मोहपात्रा भडकली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:07 IST2019-05-27T14:13:09+5:302019-05-27T16:07:57+5:30
अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्यापही हा नकार पचवू शकलेला नाही.

‘भारत’च्या एपिसोडवर सोना मोहपात्रा भडकली!!
अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्यापही हा नकार पचवू शकलेला नाही. त्यामुळेच प्रियंकाने लग्नासाठी एक सर्वोत्तम चित्रपट सोडला. अशा चित्रपटासाठी मुली आपल्या पतीला सोडतात. पण प्रियंकाने पतीसाठी चित्रपट सोडला, असे सलमान ताज्या मुलाखतीत म्हणाला. सलमानचे हे वाक्य प्रियंकाने किती मनावर घेतले, ते आम्हाला ठाऊक नाही. पण सिंगर सोना मोहपात्रा हिला मात्र सलमानचे हे बोल जराही रूचले नाही. मग काय, सोना पुन्हा एकदा भाईजानवर उखडली.
Cus @priyankachopra has better things to do in life, real men to hang out with & more importantly, girls to inspire with her journey. 🤟🏾🔴
— SONA (@sonamohapatra) 26 मई 2019
प्रियंकाला पाठींबा देत सोनाने ट्वीटरवर सलमानला लक्ष्य केले. ‘कारण, प्रियंका चोप्राला तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. खºया पुरूषासोबत हँगआऊट करायचे आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या प्रवासाने अनेक मुलींना प्रेरित करायचे आहे,’ असे ट्वीट सोनाने केले. ती केवळ इथेच थांबली नाही तर तिने भाईजानचा समाचार घेणारे आणखी एक ट्वीट केले.
A showcase & poster child of toxic masculinity. Low brow dig at not only a woman who was not in the room but a disgusting disregard & contempt for the woman & colleague sitting next to him in the same room. Unless we call out such serial bad behaviour, nothing changes, #India .🔴 https://t.co/NuEmOWQl12
— SONA (@sonamohapatra) 27 मई 2019
‘भारत’ या चित्रपटातून प्रियंकाने ऐनवेळी अंग काढून घेतले होते. शूटींग पाच दिवसांवर आले असताना प्रियंकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता. यासाठी देसी गर्लने लग्नाचे कारण दिले होते. लग्न करणार असल्याने मी चित्रपटाला वेळ देऊ शकत नाही, अशी तिची सबब होती. इतक्या ऐनवेळी प्रियंकाने नकार दिल्याने ‘भारत’च्या अख्ख्या टीमला धक्का बसला होता. प्रियंकाच्या नकारानंतर मेकर्सला घाईघाईत कॅटरिना कैफला साईन करावे लागले होते. साहजिकचं प्रियंकाच्या या अडेलतट्टू वागण्याने भाईजान कमालीचा संतापला होता.