असा काही बोलला आमीर की मागावी लागली माफी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 19:35 IST2016-07-04T14:04:35+5:302016-07-04T19:35:31+5:30
‘सुल्तान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने स्वत:ची तुलना बलात्कारपीडित महिलेशी केली आणि वाद ओढवून घेतला. आज ‘दंगल’च्या पोस्टर लॉन्चप्रसंगी सुपस्टार आमीर ...
.jpg)
असा काही बोलला आमीर की मागावी लागली माफी!!
‘ ुल्तान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने स्वत:ची तुलना बलात्कारपीडित महिलेशी केली आणि वाद ओढवून घेतला. आज ‘दंगल’च्या पोस्टर लॉन्चप्रसंगी सुपस्टार आमीर खान यालाही स्वत:च्या एका वक्तव्यामुळे लाजीरवाणे व्हावे लागले. आमीर नकळत असा काही बोलून गेला की नंतर त्याला सारवासारव करीत माफी मागावी लागली. पोस्टर लॉन्चप्रसंगी आमीर मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. याचवेळी आमीरने सलमानची तुलना एका स्टारशी केली आणि स्वत:ची तुलना वेटरशी केली. ‘जेव्हा सलमान एखाद्या ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा स्टार आलाय, असे वाटते. याऊलट मी जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा कुणी वेटर आलाय, असे वाटते’, असे आमीर म्हणाला. पण हे बोलून गेल्यावर आपण चुकलोय, हे आमीरच्या लगेच लक्षात आले. मग काय, बोलून गेलेल्या या वाक्यासाठी आमीरने माफी मागितली..वेटर आर ग्रेट पिपल...असे तो म्हणाला..बघा त्याचा व्हिडिओ...
#WATCH: Aamir Khan compares Salman Khan to a star and himself to a waiter, immediately apologizes for waiter remarkhttps://t.co/lJqbDydFbk— ANI (@ANI_news) July 4, 2016