समाधान देणारं काम करायचेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 10:17 IST2016-07-21T04:47:01+5:302016-07-21T10:17:01+5:30
बिपाशा बासु सिंग ग्रोव्हरला आता इंडस्ट्रीत १५ वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. बिप्सने बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अंदाजात करिअरला सुरूवात केली. ...

समाधान देणारं काम करायचेय!
िपाशा बासु सिंग ग्रोव्हरला आता इंडस्ट्रीत १५ वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. बिप्सने बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अंदाजात करिअरला सुरूवात केली. हॉरर चित्रपट राज आणि जिस्म यांच्यामुळे करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर तिने हलकीफुलकी कॉमेडीही अनुभवली.
करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केल्यानंतर अजून तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाहीये. चाहते मात्र तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
यावर ती म्हणते,‘ फक्त अट्टाहास म्हणून मला चित्रपट करावयाचे नाहीत. किंवा चर्चेत, बातम्यांमध्ये राहण्यासाठी मला चित्रपण करणे पसंत नाही. मला समाधान मिळावं म्हणून मला चित्रपट साकारायचे आहेत. आत्तापर्यंत मला अनेक चित्रपट आॅफर करण्यात आले. पण माझ्या मनाला जोपर्यंत एखादी स्क्रिप्ट पटत नाही, तोपर्यंत मी काहीही करणार नाहीये.