डोळ्यावर आघात होऊनही खचला नाही 'सोल्जर' फेम अभिनेता जीतू वर्मा, करतो आहे जनजागृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:13 IST2017-12-08T05:10:21+5:302017-12-08T14:13:13+5:30

प्रत्येकाच्या जीवनात संकटं येतात किंवा एखादी वाईट घटना घडते. या संकटांमुळे किंवा वाईट घटनेमुळे व्यक्तीचं संपूर्ण जीवनच पालटतं. काही ...

'Soldier' ​​Fame actor Jitu Verma, doing public awareness! | डोळ्यावर आघात होऊनही खचला नाही 'सोल्जर' फेम अभिनेता जीतू वर्मा, करतो आहे जनजागृती!

डोळ्यावर आघात होऊनही खचला नाही 'सोल्जर' फेम अभिनेता जीतू वर्मा, करतो आहे जनजागृती!

रत्येकाच्या जीवनात संकटं येतात किंवा एखादी वाईट घटना घडते. या संकटांमुळे किंवा वाईट घटनेमुळे व्यक्तीचं संपूर्ण जीवनच पालटतं. काही जण या संकटामुळे हतबल होतात. आयुष्यात घडणा-या वाईट घटनेमुळे काही जण नाऊमेद होतात. मात्र काही व्यक्ती स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतात. कितीही संकटं आली तरी त्याचा सामना करण्याची त्यांची तयारी असते. अशाच मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अभिनेता जीतू वर्मा. एखाद्या आपत्कालीन परिस्थिती दरम्यान तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळायला हवी असं विधान जीतू वर्माने केले आहे. विशेषतः शरीराच्या डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांना दुखापत झाल्यास लगेचच आपत्कालीन परिस्थितीतही उपचार देणारी सुविधा असायला हवी असं मत जीतू वर्मा याने व्यक्त केले आहे. मुंबईत नुकतंच आदित्य ज्योत 24x7 आय ट्रॉमा सेंटरचे उदघाटन आणि पाचवा आदित्य ज्योत पब्लिक एन्डॉमेंट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी जीतू वर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. आदित्य ज्योत हॉस्पिटल गेल्या 27 वर्षांपासून मुंबईत रुग्णांना सेवा देणा-या आणि एनएबीएचकडून अॅक्रिडिएशन मिळालेले असून आदित्य ज्योत हॉस्पिटलला आयएसओ-9001चे मानांकनही मिळाले आहे. डोळ्याची मोफत तपासणी, डोळे तपासणी शिबीरांचे आयोजन, गरजूं आणि गरीब रुग्णांवर मोफत डोळ्याच्या शस्त्रक्रिया आदित्य ज्योत हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या सोहळ्यात सोहळ्यात डोळ्यासारख्या नाजूक अवयवांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असल्याचे जीतू वर्माने सांगितले. जीतू वर्माने सोल्जर, बॉडीगार्ड अशा सिनेमांमधून छोट्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र याच अभिनेत्यावर काही महिन्यांपूर्वी मोठं संकट ओढावलं. माउंट अबू इथून जयपूरला तो आपल्या कारने जात होता. त्यावेळी चित्तोडगड इथं जंगलाचा मार्ग असलेल्या ठिकाणावरुन जात असताना त्याच्या गाडीवर काही इसमांनी हल्ला केला. यावेळी जीतूच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आले. यांत जीतूच्या डोळयाला गंभीर दुखापत झाली होती. तशाच जखमी अवस्थेत त्याला मुंबईत आणण्यात आलं. अभिनेता सुनील शेट्टीच्या मदतीमुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या भुवयांजवळ दहा टाके पडले होते शिवाय डोळ्याच्या बुबुळालाही इजा झाली. मात्र या हल्ल्यामुळे जीतू वर्मा खचला नाही. त्याने या घटनेचा आपल्या करिअरवर परिणाम होऊ दिला नाही. सध्या आपल्या परीने यासंदर्भात जे काही करायचे ते करण्याठी तत्पर असल्याचेही त्यानं सांगितले. 

Web Title: 'Soldier' ​​Fame actor Jitu Verma, doing public awareness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.