हे काय? सलमानपेक्षाही ‘म्हातारा’ दिसू लागलाय सोहेल खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:20 IST2021-12-15T12:54:29+5:302021-12-15T13:20:47+5:30

Sohail Khan Latest Photos : तूर्तास सोहेल खानची चर्चा होतेय ती एका वेगळ्याच कारणानं. होय, मंगळवारी सोहेल खान मुंबईत दिसला आणि त्याचे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला.

sohail khan looking older than salman khan Sohail Khan Latest Photos | हे काय? सलमानपेक्षाही ‘म्हातारा’ दिसू लागलाय सोहेल खान!!

हे काय? सलमानपेक्षाही ‘म्हातारा’ दिसू लागलाय सोहेल खान!!

अभिनेता, दिग्दर्शक व निमार्ता सोहेल खान  (Sohail Khan) म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा (Salman Khan) भाऊ हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावं तसं यश लाभले नाही. तूर्तास सोहेल खानची चर्चा होतेय ती एका वेगळ्याच कारणानं. होय, मंगळवारी सोहेल खान मुंबईत दिसला आणि त्याचे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. होय, या फोटोत सोहेल सलमानपेक्षाही ‘म्हातारा’ दिसू लागला आहे.

एका जिमबाहेर पापाराझींना सोहेलने पोझ दिल्या. ब्लॅक कलरच्या जिम विअरमध्ये सोहेल दिसला. पण वयापेक्षा बराच मोठा. सोहेलच्या चेह-यावर सुरकुत्या पाहून चाहतेही हैराण झालेत. म्हणायला सोहेल सलमानपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पण सलमानपेक्षाही वयाचा परिणाम त्याच्या चेह-यावर जाणवू लागला आहे.

(फोटो साभार)

सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. सोहेलने लग्नानंतर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. पण निर्माता म्हणून तो फार यश मिळवू शकला नाही.

सोहेलने चित्रपटातही नशीब आजमावलं. काही चित्रपटात त्याने सलमानसोबही काम केलं. पण हे सर्व सिनेमे चालले ते सलमानच्या नावावर. सध्या सोहेल अ‍ॅक्टिंगपासून दूर निर्मिती क्षेत्रात काम करतोय. काही टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचा जज म्हणून तो दिसला आहे.

Web Title: sohail khan looking older than salman khan Sohail Khan Latest Photos