सोशल मीडियावर करणचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:29 IST2016-01-16T01:17:15+5:302016-02-09T07:29:57+5:30
प्रेम आणि सोशल मीडियात सर्व काही माफ असते, अशा आशयाचे ट्विट त्याने नुकतेच केले आहे. ट्विटरवर तो आधीच सक्रिय ...

सोशल मीडियावर करणचा बोलबाला
'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचे चित्रिकरण दिल्ली, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आदी शहरांत होणार आहे. विद्याही करणार टिवटिवाट
अखेर विद्या बालनला ट्विटरचे अकाउंट मिळाले आहे. खरे तर विद्याने सहा वर्षांआधीच ट्विटर अकाऊंट घेतले होते. मात्र आता ते जाहीर केले आहे. दरम्यानच्या काळात तिच्या नावाने अनेक बनावट अकाऊंट सुरू होते. करण जोहरने विद्या बालनच्या ट्विटरवरील आगमनाचे स्वागत केले आहे. त्याने म्हटले आहे, ' माझी 'मितवा' मैत्रिण (मला काय म्हणायचे आहे ते तिला ठाऊक आहे) आता ट्विटरवर आहे. ती खूप प्रेमासाठी पात्र आहे. विद्या अलीकडे ' मोहित सुरीच्या 'हमारी अधुरी कहाणी'मध्ये दिसली होती.