तर ही आहे सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या 'केदारनाथ'ची कथा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 16:26 IST2017-09-22T10:56:57+5:302017-09-22T16:26:57+5:30

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्यासोबत केदारनाथ याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. साराचे ...

So is the story of Sara Ali Khan and Sushant Singh Rajput's 'Kedarnath'! | तर ही आहे सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या 'केदारनाथ'ची कथा !

तर ही आहे सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या 'केदारनाथ'ची कथा !

फ अली खानची मुलगी सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्यासोबत केदारनाथ याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. साराचे फॅन्स तिला मोठ्या पडद्यावर बघण्यास खूप आतुर आहेत. यात चित्रपटात साराची भूमिका काय असणार, ती या चित्रपटात कशी दिसणार याची उत्सुकता सगळ्यांच लागली आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार रिपोर्टनुसार देवभूमी  उत्तराखंडमध्ये 2013 मध्ये आलेल्या पुरापरिस्थितीवर हा चित्रपट आधारित आहे. या पुरामध्ये फक्त केदारनाथ मंदिर वाचले होते.यावेळी चित्रपटाची टीम हिमालयात शूटिंग करते आहे. पुराचा सीन शूट करुन झाल्यानंतर चित्रपटाची टीम मुंबईत येणार आहे. काही सीन्स रिअल लोकेशवर शूट करणे कठिण जात असल्याने त्यांचे चित्रिकरण स्टुडिओमध्ये करण्यात येणार आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो.  सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे. सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंग यांची मुलगी असल्यामुळे तिच्या डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी सारा करण जोहच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. 

ALSO READ : केदारनाथच्या सेटवर सारा अली खान दाखवतेय नखरे ?

तर सुशांत सिंग राजपूतकडे सध्या चित्रपटाची लाईन लागली आहे. तो 'चंदा मामा दूर के' या चित्रपटात दिसणार आहे. यात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो नासाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आला आहे. नासाला जाऊन ट्रेनिंग घेणारा तो पहिला भारतीय अभिनेता आहे. तसेच तो द ग्रेट खलीच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.     

Web Title: So is the story of Sara Ali Khan and Sushant Singh Rajput's 'Kedarnath'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.