So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 06:39 AM2017-01-24T06:39:27+5:302017-01-24T12:11:52+5:30

‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करण्याची शक्कल किंगखान शाहरूख खान याने लढवली. पण यात एका माजी नगरसेवकाचा ...

So Sad SRK !! : 'Rais' Shahrukh Khan came to the rail but one person's life was lost ... !! | So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!

So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!

googlenewsNext
ईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करण्याची शक्कल किंगखान शाहरूख खान याने लढवली. पण यात एका माजी नगरसेवकाचा नाहक जीव गेला. चित्रपट प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले होते. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते.  वडोदरा रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत समाजवादी पाटीर्चे  माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते. 
गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उतावीळ झालेत. इतके की, त्यांनी रेल्वेचं अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. पोलिसांनाही गर्दी आवरणे कठीण होऊन बसले. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार करावा लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. या गर्दीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले. गदीर्तून वाट काढणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य चार जण जखमी झालेत.



  राजधानी एक्स्प्रेसचाही ‘रईस’च्या प्रमोशनमुळे चांगलाच खोळंबा झाला. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी शाहरूख आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने जाणार होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. पण शाहरुखला स्थानकात पोहोचण्यासच उशीर झाल्यामुळे नेहमीच्या ५ वाजून ४० मिनिटांच्या वेळेऐवजी ही गाडी ५ वाजून ४८ मिनिटांनी सुटली. शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती.ही गाडी सुटते त्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सजावटही केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला प्रत्यक्षात बघता येईल आणि त्याच्यासोबत एक फोटो काढता येईल यासाठी स्थानकाबाहेरुन आणि स्थानकात चाहत्यांनी जिथे मिळेल तेथे जागा पकडली होती. बराच वेळ सुरु असलेल्या गोंधळात शाहरुख खान संध्याकाळी ५.४७ च्या सुमारास प्लॅटफॉर्मवर आला. मात्र कुणालाही कळायचा आत पोलीस आणि अंगरक्षकांच्या गराड्यात त्याने आपल्या आरक्षित डब्यात प्रवेश केला आणि त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.  


 


 

Web Title: So Sad SRK !! : 'Rais' Shahrukh Khan came to the rail but one person's life was lost ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.