/>परिणीती चोपडा दाक्षिणात्य चित्रपटात डेब्यू करणार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूच्या अपोझिट दिसणार, अशी एक बातमी होती. मात्र यानंतर बातमी आली ती परिणीतीऐवजी या चित्रपटात राकूल प्रीत सिंह हिची वर्णी लागली अशी. परिणीतीने महेशबाबू सोबतचा हा चित्रपट स्वत: नाकारला की आणखी काही, हे कळायला मात्र मार्ग नव्हता. अखेर परिणीतीनेच याचे उत्तर दिले आहे. खरे तर परिणीतीला या चित्रपटाची आॅफर मिळाली होती. पण परिणीतीने हा चित्रपट कधीच साईन केला नव्हता. परिणीतीने याबाबत सांगितले की, मी हा चित्रपट करणार आहे, ही बातमी कुणी पसरवली माहित नाही. मी याबाबत काहीही जाहीर केलेले नव्हते. मी अशी कुठलीही फिल्म साईन केलेली नाही. मला या चित्रपटाची आॅफर आली होती. चर्चाही सुरु होती. कदाचित याचमुळे मी हा चित्रपट साईन केला, अशी अफवा पसरली असावी. मला हा चित्रपट करायला आवडलाही असता. पण डेट्स मॅच होत नव्हत्या. मी होमी अदजानियांचा ‘तकदूम’ साईन केला आहे. यानंतर लगेच मी दुसºया चित्रपटाचे काम सुरु करणार आहे. मला दक्षिणात्य चित्रपट आवडतात. किंबहुना सर्वच प्रादेशिक भाषांमधील चित्रपट मला आवडतात, हे सांगायलाही ती विसरली नाही.