तर या कारणामुळे अमिताभ बच्चन यांना साकारावी लागली शोले मधील जयची भूमिका... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 13:58 IST2017-09-29T08:28:29+5:302017-09-29T13:58:29+5:30

सुपर डुपर हिट चित्रपट शोले मधील जयचे पात्र  सगळयांच्या लक्षात राहण्यासारखे आहे, होय आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचे अँग्री यंग ...

So for this reason Amitabh Bachchan had to play the role of Jaychi in Sholay ... read detailed | तर या कारणामुळे अमिताभ बच्चन यांना साकारावी लागली शोले मधील जयची भूमिका... वाचा सविस्तर

तर या कारणामुळे अमिताभ बच्चन यांना साकारावी लागली शोले मधील जयची भूमिका... वाचा सविस्तर

पर डुपर हिट चित्रपट शोले मधील जयचे पात्र  सगळयांच्या लक्षात राहण्यासारखे आहे, होय आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन आणि शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या बद्दल. शोले चित्रपटाची स्टार कास्ट मोठी असल्यामुळे अमितजींना हा चित्रपट मिळला नव्हता. याचा खुलासा शोलेचे दिग्दर्शक  रेमश सिप्पी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की असे काय कारण होते की ज्यामुळे बिग बीच्या जयाच्या भूमिकेत दिसले?
शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पीनी याबाबत खुलासा काही दिवसांपूर्वी  केला ते म्हणाले की,  त्यावेळेस अमिताभ बच्चन यांचे चित्रपट फारसे काही चालत नव्हते आणि शोले चित्रपटात आधीच मोठी आणि फेमस स्टार कास्ट होती. त्यामुळे एवढ्या सगळ्यांना सांभाळणे कठीण जात होते. त्यांना जयच्या पात्रासाठी एक अभिनेता हवा होता जो अभिनयात चांगला असेल पण फारसा फेमस नसेल. 

ALSO READ :ठग्स आॅफ हिन्दोस्तान’च्या सेटवरून लिक झाला महानायक अमिताभ बच्चनचा लूक!

त्यावेळेस सिप्पी साहेबांना तेव्हाची प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांचे नाव सुचवले होते त्यांच्या सांगण्यावरून रमेश सिप्पींनी बिग बींचे दोन चित्रपट पाहिले. ते म्हणजे  बॉम्बे टू गोवा आणि आनंद हे ते दोन चित्रपट त्यांनी पाहिले. या दोन्ही चित्रपटात अमितजीनी वेगळी वेगळी भूमिका साकारली होती त्यामुळे मग सिप्पी साहेबांनी  अमिताभ बच्चन यांची शोलेमधले 'जय'च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
अमिताभ सध्या ठॅग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. यात ते अमीर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. यात कॅटरिना कैफ आणि फातिमा सेना शेख यांच्या ही मुख्य भमिका आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना अपघात झाला होता. मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी शूटिंगला सुरुवता देखील केली. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि आमिर खान पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत असतील यात काही शंका नाही. 

Web Title: So for this reason Amitabh Bachchan had to play the role of Jaychi in Sholay ... read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.