..म्हणून ‘क्रिश ४’ येणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:18 IST2016-09-16T07:48:58+5:302016-09-16T13:18:58+5:30
बॉलिवूडमध्येही सुपरहिरोंची क्रेझ वाढत असून याच धर्तीवर हृतिक रोशनने सुपरहिट सिरीजमधील 'क्रिश ४’ लवकरच येणार असल्याची घोषणा केली. सिनेमाच्या ...

..म्हणून ‘क्रिश ४’ येणार !
मात्र हा चित्रपट का येणार याचे गुपित मात्र जरा वेगळेच आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सांगितले की, एक दिवस माझ्या पत्नीने मला ट्विटरवर क्रिशच्या रुपातील गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली. यामुळे माझा विश्वास दृढ झाला आणि मला या सिनेमाचा चौथा भाग काढण्यासाठी प्रेरणा मिळाली.
मंगळवारी हृतिकने ट्विटरवर क्रिशच्या रुपातील गणपतीचा फोटो शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, क्रिश ४ साठी गणपती बाप्पाचा आशिर्वाद. आशा आहे की सगळे उत्सवाचा आनंद घेत आहेत.
{{{{twitter_post_id####
}}}}Ganpati blessings for KRRISH4 :)) hope everyone is enjoying the festivities. Love to all. pic.twitter.com/g2g8K489AO— Hrithik Roshan (@iHrithik) September 14, 2016