म्हणून 14 वर्ष ऐश्वर्या राय बच्चन बोलली नव्हती शाहरुख खानशी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:14 IST2017-09-26T07:44:09+5:302017-09-26T13:14:09+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. गेली अनेक वर्ष दोघे एकमेकांचे तोंड बघत ...

So 14 years of Aishwarya Rai Bachchan did not speak Shahrukh Khan! | म्हणून 14 वर्ष ऐश्वर्या राय बच्चन बोलली नव्हती शाहरुख खानशी !

म्हणून 14 वर्ष ऐश्वर्या राय बच्चन बोलली नव्हती शाहरुख खानशी !

>ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. गेली अनेक वर्ष दोघे एकमेकांचे तोंड बघत नव्हते. मात्र त्यांच्यातील शत्रूत्व आता संपले आहे. दोघांनी एकमेकांपुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. खूप कमी लोकांना त्याच्यामधल्या भांडणाचे कारण माहिती आहे. आम्ही तुम्हाला आज या दोघांमधील भांडणाचे नेमक कारण सांगणार आहोत. का झाले होते ऐश्वर्या आणि शाहरुख खानमध्ये भांडण ? 2003 मध्ये दोघे चलते-चलतेमध्ये एकत्र काम करत होते. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमानचे नाते शेवटचा श्वास घेत होते. त्यामुळे सलमान आणि ऐश्वर्यामध्ये खूप भांडणं होत होती. अनेक वेळा सलमान खान ऐश्वर्यासोबत भांडण्यासाठी चलते-चलतेच्या सेटवर यायचा असे कळले होते. ज्यामुळे अनेक वेळा शूटिंगमध्येच बंद करायला लागायचे. यामुळे शाहरुखचे अनेकवेळा नुकसान व्हायचे कारण तो या चित्रपटाचा निर्माता देखील होते. मात्र एकेदिवशी सलमानने सेटवर येऊन रागामध्ये खूप हंगामा केला आणि त्यानंतर शाहरुखने चलते-चलतेमधून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला.  ऐश्वर्याच्या जागी या चित्रपटात राणी मुखर्जीला घेण्यात आले. यामुळे नाराज झालेली ऐश्वर्या जवळपास 14 वर्ष शाहरुख खानशी बोलली नव्हती.

ALSO READ : GOOD NEWS : सलमान खानला पुढच्या दोन वर्षांत बनयाचे आहे 'बाबा'
 
 
सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉय आले मात्र हे नातही फार काळ टिकले नाही. ऐश्वर्या आणि विवेकचे रस्ते लवकरच वेगळे झाले. 'गुरु'च्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले. अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नाला जवळपास सात ते आठ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र सलमान आजही अविवाहित आहे. ऐश्वर्यानंतर सलमानच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. लवकरच सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीचा 'टायगर जिंदा है' चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. तब्बल 4 वर्षांनी दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही.    

Web Title: So 14 years of Aishwarya Rai Bachchan did not speak Shahrukh Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.