डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूरवर जांबाजमध्ये चक्क शूट करण्यात आला होता smooch सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:40 IST2020-06-11T15:39:33+5:302020-06-11T15:40:53+5:30

डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या सीनची चांगलीच चर्चा रंगली होती.

smooch scene was shoot on anil kapoor and dimple kapadia in Janbaaz in | डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूरवर जांबाजमध्ये चक्क शूट करण्यात आला होता smooch सीन

डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूरवर जांबाजमध्ये चक्क शूट करण्यात आला होता smooch सीन

ठळक मुद्देओ जाने जाना या गाण्यात डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूर यांच्यावर किसिंग आणि लव्ह मेकिंग सीन चित्रीत करण्यात आला होता. आज अनेक वर्षं झाली तरी या चित्रपटातील हा सीन लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.

डिम्पल कपाडिया यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आजवर त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी बॉबी, सागर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जाबांज या चित्रपटातील डिम्पल यांचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

डिम्पल कपाडिया यांनी बॉबी या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. पण या चित्रपटानंतर त्या तब्बल एक दशक चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. पण सागर या चित्रपटाद्वारे डिम्पल यांनी कमबॅक केला आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. जाबांज या चित्रपटातील त्यांच्या बोल्ड अंदांची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती.

फिरोज खान यांच्या जाबांज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात फिरोज खान, अनिल कपूर, डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका होत्या तर श्रीदेवी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हा चित्रपट १० जून १९८६ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर रुळलेली आहेत.  या चित्रपटातील ओ जाने जाना या गाण्यात डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूर यांच्यावर किसिंग आणि लव्ह मेकिंग सीन चित्रीत करण्यात आला होता. आज अनेक वर्षं झाली तरी या चित्रपटातील हा सीन लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. डिम्पल यांच्या कारकिर्दीतील हा सगळ्यात बोल्ड सीन आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.   

Web Title: smooch scene was shoot on anil kapoor and dimple kapadia in Janbaaz in