२०१७ मधील या छोट्या बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:02 IST2017-09-19T09:32:08+5:302017-09-19T15:02:08+5:30
२०१७ हे वर्षं छोट्या बजेटच्या चित्रपटांसाठी चांगले होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण गेल्या दोन महिन्यांत अनेक ...
.jpg)
२०१७ मधील या छोट्या बजेटच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
२ १७ हे वर्षं छोट्या बजेटच्या चित्रपटांसाठी चांगले होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण गेल्या दोन महिन्यांत अनेक छोटे बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. छोटे बजेटचे चित्रपट हे वर्ल्ड ऑफ माऊथने फेमस होतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सध्या अनेक छोट्या बजेटचे चित्रपट बिग बजेट चित्रपटांइतकीच कमाई करत आहेत. हे चित्र पाहाता छोट्या बजेटच्या चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत असेच आपल्याला म्हणावे लागेल. अजय देवगणचा बादशहो आणि आयुषमान खुराना-भूमी पेडणेकर यांच्या जोडीचा शुभमंगल सावधान हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. बादशहोसारखा बिग बजेट चित्रपट असूनही शुभमंगल सावधानला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
हे बिग बजेट चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिटः
बरेली की बर्फी
आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि क्रिती सॅनन यांची मुख्य भूमिका असलेला बरेली की बर्फी हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ चार-पाच आठवडे झाले आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अजूनही खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
![bareilly ki barfi]()
शुभमंगल सावधान
बादशहो आणि शुभ मंगल सावधान हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. अजय देवगणच्या बादशहोने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. बादशहोला टक्कर देत शुभमंगल सावधानने देखील ३९.१८ करोड मिळवले.
![shubh mangal saavdhan]()
लिपस्टिक अंडर माय बुरखा
लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. सेन्सॉरच्या कात्रीत हा चित्रपट सापडूनही या चित्रपटाने १८ कोटीहून अधिक पैसे कमावले.
![lipstick under my burkha]()
हिंदी मीडियम
हिंदी मीडियम या चित्रपटात प्रेक्षकांना इरफान खानचा अभिनय प्रचंड आवडला होता. या चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. पण तरीही या चित्रपटाने ६९ करोड कमावले.
![hindi medium]()
टॉयलेट एक प्रेम कथा
अक्षय कुमारच्या टॉयलेट प्रेम कथाचे बजेट केवळ १८ करोड होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३ करोडहून अधिक कमाई केली आहे.
![toilet ek prem katha]()
Also Read : भूमी पेडणेकर म्हणते, लग्नाअगोदर सेक्स करण्यात गैरच काय?, असं तर सगळेच करतात!