Sitaare Zameen Par OTT: अखेर ९ महिन्यांनंतर आमिर खानचा 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:36 IST2026-03-10T13:26:31+5:302026-03-10T13:36:42+5:30

२० जून २०२५ रोजी आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा रिलीज होऊन ९ महिने झाले तरीही ओटीटीवर रिलीज झाला नव्हता. परंतु आता ९ महिन्यांनंतर 'सितारे जमीन पर' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.

Sitaare Zameen Par OTT release sony live aamir khan genelia deshmukh | Sitaare Zameen Par OTT: अखेर ९ महिन्यांनंतर आमिर खानचा 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज, कुठे बघाल?

Sitaare Zameen Par OTT: अखेर ९ महिन्यांनंतर आमिर खानचा 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज, कुठे बघाल?

२० जून २०२५ रोजी आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाची आधीपासून चांगली चर्चा होती. पण हा सिनेमा रिलीज होऊन ९ महिने झाले तरीही ओटीटीवर रिलीज झाला नव्हता. परंतु आता ९ महिन्यांनंतर 'सितारे जमीन पर' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. कुठे बघता येईल सिनेमा? जाणून घ्या

कुठे रिलीज होणार सिनेमा?

कोणताही सिनेमा ४० दिवसांनंतर ओटीटीवर रिलीज होतो. परंतु आमिर खानने 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज न करता युट्यूबवर रिलीज करण्यात आला होता. १०० रुपयांत हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार होता. परंतु आता आमिर आणि टीमने हा सिनेमा ओटीटीवर रिलीज केला आहे. सोनी लिव्हवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सोनी लिव्हचं सबस्क्रीप्शन आहे त्यांना हा सिनेमा युट्यूबवर फ्रीमध्ये पाहता येईल.

 'सितारे जमीन पर' सिनेमाबद्ल सांगायचं तर, या सिनेमात आमिर खानने प्रमुख भूमिका साकारली होती. आमिर खानसह जिनिलीया देशमुखही खास भूमिकेत दिसली होती.

'सितारे जमीन पर' १ ऑगस्ट २०२५ पासून जगभरात युट्यूबवर प्रदर्शित झाला होता. YouTube Movies On Demand या प्लॅटफॉर्मवर जगभरात हा सिनेमा प्रदर्शित झाला. भारतात, हा चित्रपट १०० रुपयांना झाला. तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह ३८ देशांमध्ये तो स्थानिक किंमतीसह लोकांना पाहायला मिळाला.

Web Title : 9 महीने बाद आमिर खान की 'सितारे ज़मीन पर' ओटीटी पर रिलीज़!

Web Summary : आमिर खान की 'सितारे ज़मीन पर' आखिरकार 9 महीने बाद ओटीटी पर रिलीज़ हो गई है। पहले यह फिल्म यूट्यूब पर पैसे देकर देखने के लिए उपलब्ध थी। अब, आमिर खान और जेनेलिया देशमुख अभिनीत यह फिल्म सोनी लिव पर सब्सक्राइबर देख सकते हैं। पहले यह यूट्यूब मूवीज ऑन डिमांड पर 38 देशों में उपलब्ध थी।

Web Title : Aamir Khan's 'Sitaare Zameen Par' finally releases on OTT after 9 months.

Web Summary : After nine months, Aamir Khan's 'Sitaare Zameen Par' is finally available on OTT. Initially released on YouTube for a fee, the film, starring Aamir Khan and Genelia D'Souza, is now streaming on Sony Liv for subscribers. It was previously available in 38 countries via YouTube Movies On Demand.