कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:29 IST2025-05-19T16:28:10+5:302025-05-19T16:29:58+5:30

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी

Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ या बहुप्रतिक्षित आणि हृदयस्पर्शी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’नंतर आमिरच्या ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटातील एक खास कलाकार ऋषी शहानी उर्फ 'शर्माजी' यांचं मन जिंकणारं इंट्रोडक्शन प्रेक्षकांसमोर आणलं आहे.

शर्माजीची चर्चा

सेटवर आपल्या प्रसन्न, उत्साही आणि दिलखुलास स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकणारा ऋषी हा आमिर खानसोबत डान्स, योग, मस्ती आणि शूटींगच्या वेळी एक विशेष ऊर्जेचा अनुभव देतोय. त्याच्या अजब बोलण्याच्या स्टाईलमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. विशेष म्हणजे १९९९ मध्ये ऋषी शहानी यांनी स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड गेम्समध्ये भारतासाठी स्विमिंगमध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल्स जिंकले आहेत. हे त्यांच्या प्रतिभेचं आणि ध्येयवेडेपणाचं मोठं उदाहरण आहे.


सितारे जमीन पर कधी रिलीज होणार?

आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ सिनेमा २० जून २०२५ पासून ‘सितारे जमीन पर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात दहा नवोदित कलाकार म्हणजेच अरूष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, सवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या ट्रेंड-ब्रेकींग ब्लॉकबस्टर देणारे आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. आता ते आमिर खान प्रोडक्शन्ससोबत या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये परतले आहेत.

चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे. पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका आहेत. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Web Title: Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.